कोल्हापूर : प्रभात भ्रमंतीवेळी हृदयविकाराचा धक्का बसल्याने नामांकित उद्योजक शिरीष सप्रे (वय ६८) यांचे बुधवारी निधन झाले. कोल्हापूरच्या उद्योग, सांस्कृतिक ,सामाजिक क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व हरपले.सप्रे यांनी उद्योग क्षेत्रात मोठे नाव कमावले. यश मेटालिक्स व सप्रे ॲाटो एक्सलरीज प्रा लि. या आटाेमाेबाईल क्षेत्रातील संस्थेचे ते अध्यक्ष होते. औद्योगिक क्षेत्रासोबतच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचा लक्षवेधी वावर होता. गुणीदास फौंडेशनचे ते अध्यक्ष होते.
एक अभ्यासू, करारी व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जात होते. त्यांनी सर्वसामान्यासाठी मदतीचा ओघ सुरु ठेवला होता. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त दहा सामाजिक संस्थांना प्रत्येकी ७५ हजारांची देणगी त्यांनी दिली होती. दहा हजारांहून अधिक वृक्षारोपण त्यांनी केले आहे.अमेरीकन कंपनी कॅटलफीलरने त्यांना गौरवले होते. नियमित, चोख कर भरणारे उद्योजक म्हणुन ‘जीएसटी विभागाने त्यांचा सन्मान केला होता. त्यांच्या पश्चात पत्नी सुश्मिता , मुलगी राजश्री सप्रे जाधव ,जावई आदित्य जाधव, बंधु पद्माकर सप्रे असा परिवार आहे.
© The Indian Express (P) Ltd