scorecardresearch

कोल्हापूर,सांगलीतील सव्वा लाख कृषी ग्राहकांना दिवसा वीज मिळणार;मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना गतिमान

शेतीला दिवसा, अखंडित व शाश्वत वीज देण्यासाठी कृषी क्षेत्राचा वीज भार असणाऱ्या वीजवाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यात येणार आहे.

electricity for irrigation for farmer
प्रातिनिधिक छायाचित्र

कोल्हापूर  :कृषी सिंचनासाठी दिवसा वीज मिळावी, या हेतूने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविली जात आहे. राज्य शासनाच्या वतीने महावितरण मार्फत राबवल्या जाणाऱ्या या योजने अंतर्गत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सव्वा लाख कृषी ग्राहकांना सिंचनासाठी दिवसा वीजेची सोय होणार आहे. हि माहिती सूत्रांनी शुक्रवारी दिली.

शेतीला दिवसा, अखंडित व शाश्वत वीज देण्यासाठी कृषी क्षेत्राचा वीज भार असणाऱ्या वीजवाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यात येणार आहे.  गायरान, नापीक व पडिक जमिनीवर विकेंद्रीत सौरप्रकल्प उभारणी करण्यात येणार आहेत.शासकीय जमीन नाममात्र एक रुपया या दराने भाडेपट्टा व पोटभाडेपट्ट्याने  उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रकल्प कार्यान्वित झाला असेल अशा ग्रामपंचयातींना  लक्ष प्रोत्साहनात्मक आर्थिक मदत प्रति वर्षी ५ लाख प्रमाणे ३ वर्षासाठी देण्यात येणार आहे.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
supriya sule raj thackeray
“राज ठाकरेंचं कौतुक करते, कारण…”, सुप्रिया सुळे यांचं विधान
supriya sule on pankaja munde
पंकजा मुंडेंवरील कारवाईवरून सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका; म्हणाल्या, “निष्ठावंतांवर किती अन्याय…”

हेही वाचा >>> गोकुळची सभा वादळी होण्याची चिन्हे; सभेआधी पोस्टर युद्ध रंगले

कोल्हापुरात ६५ हजार शेतकरी

कोल्हापूर जिल्ह्यातील ४३ उपकेंद्रांच्या ठिकाणी ७९५ एकर जमिनीवर १५९ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्याव्दारे अंदाजे ६५ हजार कृषी ग्राहकांना सिंचनासाठी दिवसा वीज मिळणार आहे.

सांगलीत ५९ हजार लाभार्थी

सांगली जिल्ह्यातील २८ उपकेंद्रांच्या ठिकाणी ११५३  एकर जमिनीवर १८६ मेगावॅट क्षमतेचे  प्रकल्प उभारण्यात येणार असून अंदाजे ५९ हजार कृषी ग्राहकांना सिंचनासाठी दिवसा वीज मिळणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-09-2023 at 20:10 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×