लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : प्रतिमा आणि प्रतिभा याचा मेळ घालवणारा तृतीयपंथीयांचा पहिला ‘फॅशन शो’ सोमवारी कोल्हापूर पार पडला. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकातील स्पर्धकांनी भाग घेतला. रिया मयुरी आळवेकर हिने विजेतेपद पटकावले.

दिनकरराव शिंदे समाजकार्य विभाग आणि मैत्री फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित ही स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये पार पडली. प्रा. ज्योती हिरेमठ, मिस इंडिया डॉ. वैदेही पोटे, प्रा. प्रज्ञा कापडी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यामध्ये सिंधुदुर्गची रिया मयुरी आळवेकर प्रथम, मिरजेच्या दीपा नाईक द्वितीय आणि पुण्याच्या दक्षता पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

आणखी वाचा-प्रामाणिकपणाची अशी ही ‘सृष्टी’; कोल्हापुरातील नऊवर्षीय बालिकेने प्रामाणिकपणे परत केली पैसे, दागिन्याची पर्स

यावेळी मैत्री फाउंडेशनच्या मयुरी आळवेकर, संग्राम संस्थेच्या माया गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. हिना सय्यद, अंकिता आळवेकर, मयुर सोळंकी, रिया आळवेकर, स्मिता वदन, दीपा नाईक, मयुरी आळवेकर, करीना काळी या स्पर्धकांनी या शोमध्ये रॅम्प वॉक केला.

डॉक्टर दीपक भोसले, आकाश बिरंजे, मोहन तायडे, नेहा सूर्यवंशी , पूर्वा सावंत, सुरेश आपटे , अश्विनी भाटे, वैष्णवी पवार , विशाल पिंजानी, पूनम माने, शर्वरी काटकर, योगिता माने ,पृथ्वी पाटील, संजय देशपांडे, संकेत पाटील, सुरेखा डवर, दत्ता पवार , रितेश कांबळे , राधिका बुरांडे, स्मिता कांबळे उपस्थित होते.