कोल्हापूर : सख्ख्या मुलीवर अत्याचार केल्याने नराधम बापास २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा येथील न्यायालयाने बुधवारी सुनावली. जगन्नाथ यशवंत आडके (वय ४७,रा. कोडोली ता. पन्हाळा ) असे त्याचे नाव आहे.

हेही वाचा – महापुराच्या धास्तीने कोल्हापुरातील नदीकाठावरील गावे धास्तावली

हेही वाचा – कोल्हापूर : शिवनेरीवरील छत्रपती शिवरायांच्या पादुकांवर महालक्ष्मी मंदिरात अभिषेक

याबाबत माहिती अशी की, जगन्नाथ आडके कोडोली या गावी पत्नी, तीन मुली यांच्यासमवेत राहत होता. पती-पत्नी दोघेही मोलमजुरी करून गुजराण करीत असत. २२ जानेवारी २०२२ रोजी साडेपाच वर्षांची पीडित मुलगी शाळेतील गॅदरिंग संपल्यानंतर घरी आली. तिने गुप्त जागी दुखत असल्याची आईकडे तक्रार केली. आईने खोदून चौकशी केली असता रात्रीच्या वेळी वडिलांनी कशाप्रकारे अत्याचार केला याची सविस्तर माहिती दिली. त्या आधारे पीडितेच्या आईने कोडोली पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. त्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्यासमोर झाली. अतिरिक्त सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी १२ साक्षीदार तपासले. त्यांचा विस्तृत युक्तिवाद, अन्य पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीस वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली.