कोल्हापूर: बापाने नदीत ढकलेल्या मुलीचा मृतदेह सापडला

पंचगंगा नदी घाटावर नातेवाईकांचा आक्रोश

(प्रातिनिधिक छायाचित्र)

पंचगंगा नदीमध्ये प्रणाली युवराज साळुंखे (वय 9,रा.यळगुड) या मुलीला बापाने नदी मध्ये टाकून जीव घेतला होता. इचलरकंजी नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख संजय कांबळे व सहकाऱ्यांनी यांत्रिक बोटी च्या साह्याने मुलीच्या मृतदेहाचा आज पंचगंगा नदीमध्ये शोध घेतला. मुलीच सदरचे पार्थिव कोणाकडे द्यायचे यावरून नातेवाईकांमध्ये वाद सुरू झाला आहे.

शिरोळ व हातकणंगले तालुक्यामध्ये दोन वेगवेगळ्या घटनेमध्ये बापानेच मुलीला नदीत फेकून मृत्यूच्या दाढेत ढकलून दिले असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

हुपरी येथील यळगुड गावात सावत्र बाप असलेल्या युवराज साळुंखे कडून ९ वर्षाच्या सावत्र मुलीचा घात झाला होता. त्याने आज मुलीला पंचगंगा नदीत फेकल्याची दिली कबुली दिली. इचलकरंजी शिवाजीनगर व हुपरी पोलीस पोलिसांकडून पंचगंगा नदीपात्रात शोध मोहीम घेण्यात आली.

प्रणाली या मुलीचा मृतदेह पंचगंगा नदीमध्ये आढळला. युवराज साळुंखे याला पोलिसांनी अटक केली आहे. पंचगंगा नदी घाटावर नातेवाईकांनी आक्रोश केला. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Father found body of the girl thrown in the river kolhapur news srk

ताज्या बातम्या