पंचगंगा नदीत मासे मृत; इचलकरंजी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

पंचगंगा नदीचे प्रदूषण करण्यास कारणीभूत ठरलेल्या इचलकरंजी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुरुवारी आणखी एकदा कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

पंचगंगा नदीचे प्रदूषण करण्यास कारणीभूत ठरलेल्या इचलकरंजी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुरुवारी आणखी एकदा कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या प्रश्नी आंदोलन केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग आली आहे.
शिरोळ तालुक्यातील शिरढोण येथे पंचगंगा नदीत मासे मरण्याचे आणि जलपर्णी वाढण्याचा प्रकार झाला आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बंडू पाटील, विश्वास बालिघाटे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते.त्यानंतर निद्रिस्त प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग आली. मंडळाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट घेतल्यानंतर त्यांना आंदोलकांनी धारेवर धरले. पंचगंगा नदीप्रदूषण प्रश्नी वारंवार आंदोलन करूनही तुम्ही डोळ्यावर कातडे ओढून घेतले आहे, असा प्रखर मारा करुनही अधिकारी मौन बाळगून राहिले होते.
यानंतर आज प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी ज.शं. साळुंके यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामध्ये त्यांचे इचलकरंजी नगरपालिकेच्या ४२ एमएलडी सांडपाणी यंत्रणा प्रकल्प असताना त्यातील केवळ २२ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होते. उर्वरित २० एमएलडी सांडपाणी प्रक्रिया बंद असल्याने ते काळ्या रंगाचे सांडपाणी नदीत मिसळल्याने मासे मृत पाण्याची घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे अंमलबजावणी केली जात नसल्याने याबाबतचा खुलासा ७ दिवसात करावा अन्यथा पर्यावरण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेला प्रदूषण मंडळाने दिला आहे.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fish dead panchganga river show cause notice head ichalkaranji municipality amy

Next Story
विधवा प्रथा बंदीचा ठराव सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्यात झाल्याचा अभिमान – सतेज पाटील
फोटो गॅलरी