लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : जैव वैद्यकीय कचरा वाहनात टाकल्याने कोल्हापूर महापालिकेने एका रुग्णालयास दंड केला आहे. तर अन्य चार रुग्णालयांना नोटीस बजावली असून त्यांच्याकडूनही असाच दंड वसूल केला जाणार असल्याचे सूत्रांनी सोमवारी सांगितले.

महापालिकेच्या घरगुती कचरा संकलन करणाऱ्या ॲटो टिप्परमध्ये जैव वैद्यकीय कचरा टाकणे हे बेकायदेशीर आहे. राजारामपुरी येथील डॉ. चंद्रशेखर पाटील यांचे साई कार्डीयाक सेंटरने जैव वैद्यकीय कचरा हा कचरा उठाव वाहनामध्ये टाकल्याने त्यांना नोटीस देऊन ५ हजार रुपये दंड करण्यात आला आहे.

आणखी वाचा-कोल्हापूर : इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांनी लचके तोडले; एका घोड्याचा बळी

शास्त्री नगर येथील ॲस्टर आधार तसेच राजारामपुरी येथील मोरया , जानकी व स्टार या चार रुग्णालयांनी घातक जैव वैद्यकीय कचरा रस्त्या, कोंडाळयाच्या ठिकाणी टाकल्याने त्यांना नोटीस देण्यात आली असून त्यांना प्रत्येकी ५ हजार दंड करण्यात येणार आहे. हि कारवाई सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांच्या आदेशानुसार आरोग्य निरिक्षक ऋषीकेश सरनाईक, मुनीर फरास, श्रीराज होळकर यांनी केली आहे.