दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : कतारमध्ये फुटबॉल विश्वचषक स्पर्धेची चुरस टोकाला पोहोचली असताना फुटबॉल पंढरी कोल्हापुरातील फुटबॉलप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. खेळाडूंच्या चित्रकारीचे पैलू कलानगरीत साकारले आहेत.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे
viva
सफरनामा: होली खेले मसाने में..

कोल्हापूरकरांच्या मनीमानसी फुटबॉलप्रेम भरून राहिले आहे. स्थानिक फुटबॉल स्पर्धेवेळी त्याची चुणूक दिसते. फिफा वल्र्ड कप स्पर्धेवेळी तर फुटबॉलप्रेमींचा उत्साह पाहण्यासारखा असतो. कोल्हापुरातील मध्यवर्ती ठिकाणी मेस्सी, रोनाल्डो, नेमार यांचे मोठे कट आउट लागले आहेत. आवडत्या देशांच्या ध्वजाच्या पताका फडकत आहेत.

चित्रे लक्षवेधी

कतारमध्ये विश्वचषक विजेता कोण होणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे. स्पर्धा पाहण्यासाठी कोल्हापुरातील शेकडो फुटबॉलप्रेमी कतारमध्ये उपस्थित आहेत. इकडे करवीरनगरी अंतिम टप्प्यात स्पर्धेविषयीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. येथील रायगड कॉलनीतील तुषार घाडगे या फुटबॉलप्रेमीने घरामध्ये नेमार, पेले, गॅब्रियल जीजस, लिओनेल मेस्सी यांच्यासह भारतीयांच्या गळय़ातील ताईत असलेला सुनील छेत्री या फुटबॉल खेळाडूंची नितांत सुंदर चित्रे रेखाटली आहेत. यामुळे भिंतींना जिवंतपणा आला आहे. चित्रे पाहण्यासाठी फुटबॉल शौकीन गर्दी करत आहेत.

पेले स्टेट्सवर

तर दुसरीकडे जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे कायमस्वरूपी आकर्षण राहिलेले फुटबॉलपटू पेले यांचे जुन्या काळातील एक चित्र समाज माध्यमात अग्रेषित होत आहे.

धार्मिक देवदेवतांच्या चित्रासाठी विख्यात असलेले दिवंगत चित्रकार पी. सरदार यांनी ऐंशीच्या दशकात चितारलेले पेले यांचे हे चित्र अनेकांनी स्टेटस म्हणून वापरले आहे. या चित्राचा पुन:प्रत्यय घेण्यासाठी हरून सरदार पटेल यांच्या स्टुडिओकडे फुटबॉल शौकीन वळत आहेत.