कोल्हापूरमध्ये फुटबॉल ज्वर | Football fever in Kolhapur amy 95 | Loksatta

कोल्हापूरमध्ये फुटबॉल ज्वर

तांबडा पांढरा, झणझणीत मिसळ आणि कुस्ती याप्रमाणे रांगडय़ा कोल्हापूरकरांचे आणखी एक मर्मस्थळ म्हणजे फुटबॉल.

कोल्हापूरमध्ये फुटबॉल ज्वर
(कोल्हापूरमध्ये आवडत्या खेळाडूंचे कट आउट असे उभारले आहेत.)

तांबडा पांढरा, झणझणीत मिसळ आणि कुस्ती याप्रमाणे रांगडय़ा कोल्हापूरकरांचे आणखी एक मर्मस्थळ म्हणजे फुटबॉल. फिफा जागतिक विश्वचषक जागतिक फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने तर कोल्हापूरकरांमध्ये जणू विलक्षण ज्वर संचारला आहे. त्याच्या खाणाखुणा अवघ्या करवीर नगरीत पाहायला मिळत आहेत.

कोल्हापूरमध्ये कुस्ती हा आवडता खेळ. क्रिकेटही खेळणाऱ्यांची संख्याही चिक्कार. पण कोल्हापूरची क्रीडा खेळाची खरी आवड आहे ती फुटबॉल. अनेक पेठांचे स्वत:चे फुटबॉल क्लब आहेत. त्यांचे आवडते खेळाडूही ठरलेले आहेत. विश्वचषक सुरू झाला की लाडक्या खेळाडूंचे कट आउट, फ्लेक्स, भिंतीवरची चित्रे, पताका यामुळे वातावरण भारून जाते.

कतारमध्ये फुटबॉल विशेष सुरू होत असताना करवीर नगरीत असेच चित्र पाहायला मिळत आहे. सायबर चौकात रेनोल्डचे ३५ फूट उंचीचे, मेस्सीचे कट आउट आझाद चौकात, मंगळवार पेठ पाटाकडील तालीमने नेमारचे कट आउट उभारले आहे. आपल्या आवडत्या देशाचा ध्वजही उभारले आहेत. तर काही ठिकाणी २४ देशांचे ध्वजाची चित्र पताका झळकत आहेत. शिवाय आवडत्या देशाची जर्सी घालून मिरवण्यात ही वेगळीच खुमारी आहे.

पाचवीलाही फुटबॉलच
अपत्य जन्मानंतर पाचवीची पूजा करण्याची पद्धत आहे. सध्या मठ क्लबचे खेळाडू अजय जगदाळे यांच्या घरी मुलाचा जन्म झाल्यानंतर कृत्रिम हिरवळीवर आवडते खेळाडू फुटबॉल खेळत आहेत अशा रूपातील पूजा बांधण्यात आली आहे. खेळाडूंच्या जर्सीही बाजूला झळकत आहेत. त्यांच्या पहिल्या मुलाच्या वेळीही अशाच पद्धतीची पूजा साकारण्यात आली होती.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-11-2022 at 00:01 IST
Next Story
दूधगंगा नळपाणी योजना : विसंवादाचे चित्र