दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : गणेशोत्सवातील विधायक परंपरा जपण्यात यंदाही कोल्हापूर जिल्हा आघाडीवर राहिला. घरगुती गणेश विसर्जन पर्यावरण पूरक करण्यात कोल्हापूर महापालिका आणि ग्रामीण भागातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद उमेद वाढवणारा होता. पण याचवेळी नदीमध्ये विसर्जन करण्याचा अट्टहास इचलकरंजी महापालिकेसह नगरपालिकांमध्ये दिसला. विधायक चळवळ पुढे जात असताना तिचा उलटय़ा गंगेचा प्रवाह चिंतनीय ठरला आहे.

Nagpur, Maherghar, safe delivery
नागपूर : सुरक्षित प्रसूतीसाठी चार माहेरघर कधी?
nashik, 14 Malnourished Children, Found in Trimbakeshwar Taluka, Treatment Malnourished Children , malnutrition in Trimbakeshwar Taluka, malnutrition in nashik, nashik news, Trimbakeshwar news,
त्र्यंबकेश्वर तालुक्यात १४ कुपोषित बालके, ग्राम बालविकास केंद्र सुरु करण्याचे आदेश
Water supply to villages by tankers in Pune Satara Sangli and Solapur districts pune news
पश्चिम महाराष्ट्र टँकरग्रस्त; सर्वाधिक झळ सातारा, पुण्याला
Navi Mumbai
नवी मुंबई : एमएमआरडीएच्या नवनगर निर्मितीमुळे १२४ गावे उद्ध्वस्त होण्याची भीती

कोल्हापूर जिल्ह्याने नेहमीच पुरोगामी धोरण स्वीकारले आहे. हेरवाड गावात यावेळी श्रींची आरती विधवांच्या प्रथा बंद करणाऱ्या चर्मकार समाजातील पहिल्या महिलेकरवी करून पुरोगामी धोरण कायम टिकवले. याच शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड गावात पाच मशिदीमध्ये १०० वर्षांहून अधिक काळ मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. सन २०१८ मध्ये गणेशोत्सव व मोहरम एकत्र आला असताना करवीरनगरीत अनेक ठिकाणी गणराया आणि पंजाची एकत्र प्रतिष्ठापना करून सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले होते.

हेही वाचा >>> ईडा पिडा टळून राज्यातल्या सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे; मुख्यमंत्र्यांची गणरायाच्या चरणी प्रार्थना

सामाजिक सलोख्याचे भान

कोल्हापुरातील गणेश उत्सवाला विधायकतेचे वळण देण्याचे उपक्रम अनेक प्रकारे राबवले गेले. तत्कालीन पोलीस अधीक्षक माधवराव सानप यांच्या संकल्पनेतून ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना मांडली गेली. जिल्ह्यात १ हजारपेक्षा अधिक गावात, राज्यातही सुमारे हजाराहून लहान मोठय़ा गावात हा उपक्रम राबवला जातो. जोडीलाच पंचगंगा नदी, रंकाळा तलाव यांचे प्रदूषण होत असल्याने पर्यावरणपूरक श्री विसर्जन करण्याचा पायंडा याच शहराने पाडला. या उपक्रमाला प्रतिवर्षी भाविकांचा प्रतिसाद वाढत आहे.

यावर्षी घरगुती गणेशाचे विसर्जन होत असताना कोल्हापुरात २५० वर ठिकाणी ५५ हजारांहून अधिक श्रीमूर्ती कृत्रिम कुंडात विसर्जित करण्यात आल्या. तर १३५ टन निर्माल्य संकलन करण्यात आले असून त्यापासून दरवर्षीप्रमाणे सेंद्रिय खत बनवले जाणार आहे. पर्यावरणपूरक गणेश उत्सवाची परंपरा तीस वर्षांनंतरही कायम ठेवली. यावर्षी एकही भाविक पंचगंगा नदीकडे विसर्जनासाठी वळला नाही. पंचगंगा घाटावरील विसर्जनाची गर्दी यावेळी पूर्णपणे आटली होती. ग्रामीण भागातूनही मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय ठरला. जिल्ह्यातील १२ तालुक्यांत पावणेतीन लाख मूर्ती पर्यावरणपूरक विसर्जित करण्यात आल्या. ग्रामीण भागात ५३१ टन निर्माल्य संकलित करण्यात आले.

इचलकरंजीकरांची वेगळी वाट

इचलकरंजी येथील गणेश विसर्जनाचा मुद्दा यंदा वादग्रस्त ठरला आहे. आमदार प्रकाश आवाडे, नगरपालिकेचे पर्यावरणदूत गजानन महाजन गुरुजी, हिंदूत्ववादी संघटना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आदींनी पंचगंगा नदीत विसर्जन करण्याची भूमिका घेतली. त्यावर लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, पर्यावरण कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते यांच्यातील रंगलेल्या वादाची व्याप्ती हा वेगळय़ा लेखाचा विषय ठरावा इतका मोठा आहे. पण याचा परिणाम म्हणजे इचलकरंजीमध्ये पंचगंगा नदीकाठ विसर्जनासाठी जत्रेसारखा फुलून गेला होता. तरीही येथील १० हजारांवर भाविकांनी पर्यावरणपूरक विसर्जन करण्याची दक्षता दाखवली. अन्य नगरपालिकांमध्येही असेच चित्र दिसून आले. जिल्ह्यातील १२ नगरपालिका, नगर परिषद येथे मिळून १८ हजारांवर गणेशमूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले.

वादाची किनार

दरम्यान, पर्यावरणपूरक विसर्जनाला कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी श्रींचे विसर्जन करताना घाई-गडबड दिसून आली. अशा विसर्जनाबाबतची चित्रफिती समाजमाध्यमातून प्रसारित झाल्यानंतर त्यावर टीकाटिप्पणी करण्यात आली. या विरोधात भाजप, हिंदूत्ववादी संघटना यांनी प्रशासनावर टीकेचा रोख ठेवला आहे. या संघटनांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन हा प्रकार रोखला जावा, अन्यथा या विरोधात आवाज उठवावा लागेल, अशी भूमिका घेतली. यातून पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला वादाची किनार लागताना दिसत आहे.