कोल्हापूर - विश्व हिंदू परिषद भारतातील सर्व राज्यात आणि तालुका स्तरापर्यंत पोहोचली आहे. यंदा हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण करताना संघटनेचा देश-विदेशात विस्तार करणार आहे, अशी माहिती केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी बुधवारी येथे दिली.कोल्हापुरातील जिव्हेश्वर समाज हॉलमध्ये झालेल्या विश्व हिंदू परिषद हितचिंतक मेळाव्यात ते बोलत होते. स्वागत जिल्हामंत्री विधीज्ञ सुधीर जोशी-वंदूरकर यांनी केले. महाराष्ट्र गोवा बार असोशिएशनचे अध्यक्ष विवेक घाडगे यांनी विहिप आणि सहयोगी संस्था ची विविध सेवा कार्य समाजासमोर प्रकर्षाने यावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली . घाटगे सह ज्येष्ठ कार्यकर्ते हसमुखभाई शहा - प्रफुल्ल जोशी यांचे स्वागत करण्यात आले. मिलिंद पराठे म्हणाले, समाजातील सकारात्मक वृत्ती वाढवण्यासाठी विविध सेवा कार्यातून विश्व हिंदू परिषदेने गेल्या ६० वर्षात बजरंग दल, मातृशक्ती, दुर्गा वहिनी या आपल्या सहयोगी संस्थामार्फत मोठे योगदान असल्याचे दिले आहे. जगभरातील हिंदूची काळजी भारतीय हिंदूंनी घ्यावी अशी मानसिकता वाढत असून हेच विहीपच्या व्यापक कार्याची प्रचिती असल्याचेही त्यांनी सांगितले. घरवापसी साठी व्यापक प्रमाणात विहिप प्रयत्न करत असून त्यात समाजातील सर्व घटकांनी आपले योगदान द्यावे ,असे आवाहन त्यांनी केले . हेही वाचा >>>कोल्हापूर लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपच जिंकेल – चंद्रकांत पाटील यावेळी भाजपा खासदार धनंजय महाडीक, अशोक देसाई आप्पा लाड ,श्रीकांत पोतनीस, दिलीप मैत्राणी, श्वेता कुलकर्णी, मातृशक्ती च्या सौ . बंबलकर, माधव कुंभोजकर,अनिरुद्ध कोल्हापुरे, केशव गोवेकर सह विहिप,बजरंग दलचे कोल्हापूर,इचलकंरजी, पन्हाळा,कोडोली ,कागल मधील पदाधिकारी उपस्थित होते .