गोकुळ दूध संघाने म्हैस दूध खरेदी दरामध्ये उद्या रविवारी पासून म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर दीड रुपये वाढ केली आहे.तर गाय दूध खरेदी दरात २ रूपये कपात केली आहे.संचालक मंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे,अशी माहिती संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली.
हेही वाचा >>> विसर्जन मिरवणुकीनंतर कोल्हापुरात चपलांचा खच




म्हैस दूध खरेदी दरामध्ये ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ करीता प्रतिलिटर ५१.३० रुपये वरून ५२.८० रुपये करण्यात आला आहे. राज्यात खाजगी व इतर दूध संघांचे गाय दुधाचे खरेदी दर कमी झाले आहेत. बाजारपेठेतील दुध पावडर, बटर, लोणी यांचे दर कमी झाले आहेत. या सर्व बाबींचा विचार करून गाय दूध खरेदी दर कमी केले आहेत. गाय दुधामध्ये ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ करीता प्रतिलिटर गाय दूध खरेदी दर ३५ रूपये वरून ३३ रूपये करण्यात आला आहे.