कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीसाठी आज सकाळी ११ वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी बहुमत असतील समविचारी आघाडी आणि महायुती यांच्यात सत्तेचे नाट्य रंगले आहे. महायुतीच्या गोटातून मिळालेल्या व्यक्तीनुसार त्यांचे बारा संचालक अनुपस्थित राहणार आहेत. तर समविचारी आघाडीचे १३ संचालक उपस्थित राहणार आहेत. १४ संचालक उपस्थित राहिल्यानंतर गणपूर्ती होते. ती न झाल्यास निवडणूक निर्णय अधिकारी कोणता निर्णय घेणार यावर पुढील राजकारण अवलंबून असणार आहे.

गोकुळची निवडणूक होऊन आमदार सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीचे १३ संचालक निवडणूक आले आहेत. तर महायुतीकडे १२ संचालक आहेत. तथापि दोन स्वीकृत संचालक संचालकांना मतदानाचा अधिकार देऊन गोकुळ मध्ये अध्यक्ष पद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे आजच्या सभेला बारा संचालक उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे १४ संचालक उपस्थित नसल्याने सभा गणपती अभावी होईल. त्यानंतर पुढील सभा होण्यास किमान पंधरा दिवसाचा अगदी राहील असे सांगितले जाते.

यादरम्यानच्या काळामध्ये राज्य शासनाने गोकुळमध्ये महायुतीचे दोन तज्ञ संचालक तातडीने निवडायचे. आणि त्याचवेळी त्यांना मताचा अधिकार देणारा मंत्रिमंडळाचा निर्णय घ्यायचा, असे डावपेच सुरू आहेत. दरम्यान आज सकाळी पत्रकारांशी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले की , दोन तज्ञ संचालकांना निवडून मताचा अधिकार देण्याची बाब कायद्याच्या पातळीवर टिकेल याची खात्री देता येत नाही. शिवाय अशा पद्धतीने बहुमत मिळवले तर लोकशाहीला अर्थ करणार नाही. जनमतांचा कौल आमच्या बाजूने आहे.

निवडणुका न घेताच सत्ता मिळवण्याचा हा मार्ग होईल. याशिवाय महापालिका नगरपालिका येथील स्वीकृत नगरसेवकांनाही असे अधिकार द्यावे लागतील. गोकुळ अध्यक्ष निवड सभेला महायुतीचे काही संचालक उपस्थित राहण्याचे तयार आहेत. मात्र नेत्यांचे मत वेगळे पडत आहे. आजच्या मिटींगला नेमके काय होते ते पाहून पुढील निर्णय घेतला जाईल असे आमदार सतेज पाटील म्हणाले.