लोकसत्ता विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : गोकुळ दूध संघाने दूध विक्रीत प्रति लिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबई, पुणे या महानगरातील ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादन संघ (गोकुळ) हा राज्यातील सर्वात मोठा दूध संघ आहे. या संघाची सर्वाधिक विक्री मुंबई, पुणे या शहरांमध्ये होते. १ जुलैपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. आणखी वाचा-‘गोकुळ’च्या औषध खरेदी घोटाळ्याच्या पत्राने खळबळ ; संघाकडून इन्कार ग्राहकांत नाराजी गाय दूध मुंबई व पुणे या दोन शहरात प्रति लिटर ५४ रुपये ऐवजी ५६ रुपयांना मिळणार आहे. प्रति लिटर दोन रुपयांचा फटका या ग्राहकांना सहन करावा लागणार आहे. गोकुळ दूध संघाने संघाकडून सातत्याने दूध दरात वाढ केली जात असल्याने या दरवाढीबद्दल ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.