कोल्हापूर :  गोकुळ दूध संघाची निवडणूक तोंडावर असताना संघाशी संबंधित ४२७ संस्था अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. हा निर्णय सोमवारी विभागीय दुग्ध निबंधकाकडू जाहीर झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांना धक्का बसला आहे. विशेष म्हणजे यामध्ये अवसायनात निघालेल्या १३०८ संस्थांचा समावेश नाही. त्यामुळे त्यांच्या बाबतीतही अशीच कारवाई होते का याकडे लक्ष वेधले आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राजकारण तापले आहे. गोकुळ मधील भ्रष्टाचारी कारभाराची चर्चा होऊ लागल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळ प्रथमच अधिकाऱ्यांचे प्रशासक मंडळ नियुक्त केले आहे.

तर गोकुळ मधील वाढवण्यात आलेल्या संस्थांच्या पात्रतेबाबत निर्णय घेण्यासाठी कृष्णा ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थांबाबत सुनावणी सुरू होती. दरम्यान, आज दुग्ध निबंधकायांनी गोकुळच्या ४२७ संस्था अपात्र ठरवल्या आहेत. हा सत्ताधारी गटाला धक्का बसला आहे. यामुळे गोकुळच्या निवडणुकीच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या संस्था जात्यात यामध्ये अवसायनात निघालेल्या १३०८ संस्थांचा समावेश नाही. गोकुळ कडे ५४२७ नोंदवल्या गेल्या आहेत. त्यातील या १३०८ संस्थाही अशाच पद्धतीने अपात्र ठरण्याची जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्राधिकारी मंडळ

राज्यातील सर्वात मोठ्या गोकुळ दूध संघावर प्रथमच प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. पाच अधिकाऱ्यांचे प्राधिकारी अधिकारी मंडळ यापुढे संघाचे कामकाज पाहणार आहे.    साताऱ्याचे जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक अध्यक्ष असलेल्या प्राधिकृत अधिकारी मंडळांमध्ये चंदगडचे सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे, मुळशी येथील सहाय्यक निबंधक सुनील धायगुडे, पणन विभागाचे लेखापरीक्षक सागर बलकवडे व कोल्हापूर जिल्हाधिकारी धर्मादाय रुग्णालय कक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत परळकर अशा पाच जणांचा समावेश आहे.

हा निर्णय भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील, प्रकाश बेलवाडे यांना दिलासा देणारा तर वैद्यकीय शिक्षण मंत्री गोकुळचे नेते यांना धक्का मानला जात आहे. गोकुळ दूध संघाची संचालक मंडळाची मुदत आज ४ मे रोजी संपुष्टात आली. सहकार कायद्यातील नव्या तरतुदीनुसार संचालक मंडळाची पदे पुढे सुरू राहू शकत नसल्याने तसेच व्यवस्थापक मंडळांमधील पोकळी दूर करण्यासाठी उपरोक्त पाच जणांचे प्राधिकृत अधिकारी मंडळ नियुक्त करीत असल्याचे पत्र आज पुणे दुग्ध विभागाचे उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी जारी केले आहे. 

संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर गोकुळ मध्ये प्रशासक नियुक्त होणार असा दावा भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील, गर्जना संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बेलवाडे यांनी केला होता. तर त्यांचे विधान म्हणजे अफवा आहे असे मत गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी व्यक्त केले होते. तथापि आता गोकुळमध्ये प्राधिकारी अधिकारी मंडळ नियुक्त झाल्यामुळे मुश्रीफ यांचे विधान फोल ठरले असून आमदार पाटील व प्रकाश बेलवाडे यांचे म्हणणे खरे ठरले आहे. त्यामुळे आमदार पाटील आणि प्रकाश बेलवाडे यांनी केलेल्या दाव्यानुसार यापुढे गोकुळ दूध संघातील भ्रष्टाचाराचे प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे. तसेच नव्याने वाढवण्यात आलेल्या ११०८ प्राथमिक दूध संस्थांच्या अस्तित्वावरही टांगती तलवार राहण्याची शक्यता दिसत आहे.