कोल्हापूर : गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यास गुरुवारी कोल्हापूर सर्किट बँकेने नकार दिला. यामुळे गोकुळ मध्ये प्रशासकराज येणार असे स्पष्ट झाले आहे. गोकुळच्या संचालक मंडळासह नेत्यांनाही झटका देणारा ठरला आहे. तर याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांना दिलासा मिळाला आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीवरून कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीमध्ये अंतर्गत मतभेद ताणले मध्ये आणले गेले आहेत. तर दुसरीकडे गोकुळ दूध संघातील ११०८ प्राथमिक दूध संस्था बेकायदेशीरित्या स्थापन करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून गर्जना संघटनेचे प्रकाश बेलवाडे यांनी याचिका दाखल केली आहे. याबाबत न्यायालयाने वरील प्रमाणे निर्णय दिला आहे.

याबाबत प्रकाश बेलवाडे यांनी सांगितले की, गोकुळ दूध संघातील भ्रष्टाचारा विरोधात मोहीम उघडलेली आहे. गोकुळ दूध संघामध्ये प्रशासक नियुक्त होणार हे आता स्पष्ट झाले आहे. प्रशासक काळात गोकुळ मधील कारभार किती भ्रष्ट पद्धतीने झाला यावर प्रकाशझोत पडणार आहे.