कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सभेत संघाच्या विस्तारीकरणास मंजुरी देण्यात आली. याअंतर्गत वाशी (मुंबई) आणि भोकरपाडा (रायगड) येथे संघाचे दोन नवे प्रकल्प उभे केले जाणार असून त्यासाठीच्या ३२४ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेस पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.

11 billion dollar semiconductor project in pune say union minister rajeev chandrasekhar
पुण्यात ११ अब्ज डॉलरचा ‘सेमीकंडक्टर’ प्रकल्प! केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्र्यांची मोठी घोषणा
electric bus
कल्याण परिसरातील प्रवाशांसाठी एकत्रित बस सेवेचा विचार; आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांची माहिती
confidence petroleum bw lpg jv to invest rs 650 crores in jnpt for new lpg terminal
जेएनपीटीमध्ये ६५० कोटींच्या गुंतवणुकीतून नवीन एलपीजी टर्मिनल; नॉर्वेस्थित बीडब्ल्यू एलपीजीशी भागीदारीतून ‘कॉन्फिडन्स पेट्रोलियम’ची योजना
Proposed to lease out ST land for 60 to 90 years instead of 30
एसटीची जागा भाडेतत्त्वावर देणार, ३० ऐवजी ६० ते ९० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव

या विस्तारीकरण प्रस्तावानुसार संघातर्फे वाशी येथे जागा खरेदीसाठी संघ १९ कोटी रुपये स्वभांडवलातून गुंतवणार आहे. येथे बांधकाम केल्यानंतर मुंबईतील दूध विक्रीची क्षमता वाढणार आहे. भोकरपाडा येथे १६ एकर जागा शासनाकडून घेतली जाणार आहे. यासाठी ४४  कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. बांधकामासह इतर १३० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. असा ३२४ कोटी खर्चाचा प्रस्ताव आजच्या सभेत मान्य करण्यात आला. ‘गोकुळ’चे मुख्य वितरण क्षेत्र मुंबई आणि परिसरात आहे. नव्या वाढीव क्षमतेनुसार व्यवस्थेचे विस्तारीकरणाची गरज निर्माण झाली होती. या नव्या प्रकल्पातून मुंबईत पाठवण्यात आलेल्या दुधावरील प्रक्रियेपासून ते पॅकिंगपर्यत सर्व गोष्टी ‘गोकुळ’ स्वत:च्या प्रकल्पातून करेल.

पहिल्यांदाच सभेला पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या दोन्ही मंत्रांचा तसेच लवकरच निवृत्त होणारे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. माजी अध्यक्ष संचालक अरुण डोंगळे यांनी आभार मानले.