लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापूर शहर हद्दवाढ रखडकथा आता भव्य फलकाद्वारे मांडण्याचा फंडा कोल्हापूरकरांनी सुरू केला आहे. येथील मिरजकर तिकटी चौकात महापालिका हद्दवाढ झालीच पाहिजे, अशा फलक गुरुवारी उभा करण्यात आला.

नगरपालिकेची महापालिका होऊन सहा दशके उलटली तरी हद्दवाढ झालेली नाही. हद्द वाढ होण्यासाठी पुन्हा एकदा शहरवासीयांनी कंबर कसली असताना ग्रामीण भागातून याला विरोधाचे नारे दिले जात आहेत.

हद्दवाढ गरजेची कशासाठी आहे हे मांडण्यासाठी आता असा भव्य फलक आज शहरात उभा करण्यात आला. त्यावर शहरातील सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधांचा लाभ घ्यायचा आणि ग्रामीण भागातून विरोध करायचा यावर मार्मिक टिप्पणी करण्यात आली आहे. या वेळी हद्दवाढ झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, कोल्हापुरातील नागरी सुविधांचा लाभ घेतला जातो पण ग्रामीण भागातून हद्दवाढीला विरोध केला जातो हे चुकीचे आहे. हद्दवाढ करण्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सकारात्मक आहेत. कृती समितीचे निमंत्रक माजी महापौर आर. के.पोवार, बाबा पार्टे, दिलीप देसाई, बाबा इंदुलकर, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.