इचलकरंजीतील आयजीजीएम रुग्णालय ३०० खाटचे करण्यास आरोग्य विभागाची मान्यता – प्रकाश आवाडे

रुग्णालय लवकरच सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज होऊन आवश्यक ते सर्व उपचार उपलब्ध होतील, अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी सोमवारी दिली.

MLA Prakash Awade
आमदार प्रकाश आवाडे

कोल्हापूर : इचलकरंजी शहर व परिसरासह सीमाभागातील नागरिकांसाठी आधारवड असलेले इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय (आयजीजीएम) हे ३०० खाटचे करण्यास  राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे. हे रुग्णालय लवकरच सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज होऊन आवश्यक ते सर्व उपचार उपलब्ध होतील, अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी सोमवारी दिली.

तत्कालीन इचलकरंजी नगरपरिषदेने आर्थिक कारणांमुळे हे रुग्णालय सन २०२६ मध्ये ते राज्य शासनाकडे हस्तांतरण केले. करोना महामारीच्या काळात कोविड केंद्र बनलेल्या या रुग्णालयात एकाचवेळी ३५० रुग्णांवर उपचार करता आले होते.  हाच धागा पकडून आमदार आवाडे यांनी रुग्णालय इमारत दुरुस्तीसाठी साडे १८ कोटी रुपये मंजूर करुन आणले. त्याचबरोबर या रुग्णालयास  २०० खाटची मान्यता ३०० करण्यात यावी अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन सोमवारी सार्वजनिक आरोग्य विभागाने या संदर्भातील अध्यादेशही जारी केला आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 20:58 IST
Next Story
पालकमंत्री दीपक केसरकर यांना हटवण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात निदर्शने
Exit mobile version