कोल्हापूर : इचलकरंजी शहर व परिसरासह सीमाभागातील नागरिकांसाठी आधारवड असलेले इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय (आयजीजीएम) हे ३०० खाटचे करण्यास  राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे. हे रुग्णालय लवकरच सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज होऊन आवश्यक ते सर्व उपचार उपलब्ध होतील, अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी सोमवारी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तत्कालीन इचलकरंजी नगरपरिषदेने आर्थिक कारणांमुळे हे रुग्णालय सन २०२६ मध्ये ते राज्य शासनाकडे हस्तांतरण केले. करोना महामारीच्या काळात कोविड केंद्र बनलेल्या या रुग्णालयात एकाचवेळी ३५० रुग्णांवर उपचार करता आले होते.  हाच धागा पकडून आमदार आवाडे यांनी रुग्णालय इमारत दुरुस्तीसाठी साडे १८ कोटी रुपये मंजूर करुन आणले. त्याचबरोबर या रुग्णालयास  २०० खाटची मान्यता ३०० करण्यात यावी अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन सोमवारी सार्वजनिक आरोग्य विभागाने या संदर्भातील अध्यादेशही जारी केला आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health department approves construction 300 bed iggm hospital in ichalkaranji prakash awade ysh
First published on: 20-03-2023 at 20:58 IST