scorecardresearch

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस

जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाळी वातावरण आहे. पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेकडून वर्तवण्यात आली होती.

कोल्हापुरातील शाहू टोल नाका परिसरात पावसाच्या पाण्यातून वाहने मार्ग काढत होती.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी जोरदार पाऊस झाला. तीन दिवसानंतर पुन्हा पाऊस पडल्याने नागरिकांना उकाडय़ापासून दिलासा मिळाला.

जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाळी वातावरण आहे. पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेकडून वर्तवण्यात आली होती. दुपारी शिवाजी विद्यापीठ, शाहू टोल नाका, राष्ट्रीय महामार्ग, लोणार वसाहत आदी भागात मुसळधार पाऊस झाला. जोरदार वारे सुटले होते. सुमारे तासाहून अधिक काळ पाऊस पडत होता. जिल्ह्याच्या अन्य भागातही पाऊस झाला. कोल्हापूर शहरात मात्र पावसाळी वातावरण होते.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Heavy rains in kolhapur district zws

ताज्या बातम्या