scorecardresearch

मी सुद्धा मराठा आहे, गावात बंदी चालणार नाही – संजय मंडलिक; शिवीगाळ झाल्याने तणाव

सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलन सुरू असून नेत्यांना गावबंदी केली आहे.

ban will not work in the village says Sanjay Mandalik
सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची खासदार संजय मंडलिक यांनी संवाद साधला. (फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : मी ही मराठा आहे. आरक्षणासाठी आंदोलन केले आहे. गाव बंदी सारखा प्रकार चालणार नाही, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी आंदोलकांना उत्तर दिले.

Chhagan Bhujbal 5
“…नाहीतर त्याला राजकारणाचा वास येईल”, मराठा आरक्षणावरील टीकेवरून भुजबळांचा इशारा
Nana Patole criticized Devendra Fadnavis
“फडणवीस, गडकरींच्या विकासाच्या पोकळ गप्पा अन् भाजपाचा भ्रष्ट कारभार उघड”, असे का म्हणाले नाना पटोले? वाचा…
Babanrao Taiwade
मनोज जरांगेंनंतर आता नागपुरात बबनराव तायवाडे यांचे अन्नत्याग आंदोलन; काय आहे मागणी, वाचा…
Maratha Sakal Samaj Jalsamadhi
“…तर वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलने उभारू”, जलसमाधी आंदोलन करून सकल मराठा समाजाचा सरकारला इशारा

सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलन सुरू असून नेत्यांना गावबंदी केली आहे. हळदी (ता. कागल) येथे एका कार्यक्रमासाठी खासदार संजय मंडलिक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार आदी गेले होते. तेव्हा तेथील कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनांचा ताफा रोखून गावबंदीची माहिती दिली.

आणखी वाचा-कोल्हापूर : साखर कारखान्यांना ऊस देण्यासाठी शिरोळमध्ये आंदोलन

राजीनामा देण्याची तयारी

त्यांच्याशी संवाद साधताना खासदार मंडलिक म्हणाले, कोल्हापूर येथील सकल मराठा समाजाच्या आंदोलनात मी भाग घेतला होता. तेथेच खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी मुख्यमंत्र्यांकडे दर्शवली होती. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या दोन खासदारांनी आधीच राजीनामा दिला आहे. राजीनामा देऊन हा प्रश्न सुटणार नाही. यासाठी शासनाने चार डिसेंबर पर्यंत मुदत दिलेली आहे. लोकसभेचे अधिवेशन सुरू होत असून त्यामध्येही हा विषय पुन्हा उपस्थित करणार आहे. आरक्षण मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असताना गाव बंदी सारखा प्रकार सुरू आहे. मीही मराठा आहे याची जाणीव त्यांनी करून दिली.

धक्काबुक्की, शिवीगाळ

यावेळी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये वादावादी झाली. धक्काबुक्की, शिवीगाळ असा प्रकार घडल्याने तणाव निर्माण झाला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: I am also a maratha but ban will not work in the village says sanjay mandalik mrj

First published on: 21-11-2023 at 18:59 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×