कोल्हापूर : इचलकरंजी महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक राजू पुजारी यांचा जातीचा दाखला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवला आहे. हा भाजपला धक्का ठरला आहे.

तक्रारदार रवी लोहार, अ‍ॅड. सुरज ओगले,अ‍ॅड. अर्चना कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, प्रभाग क्रमांक १५-अ मधून मागास प्रवर्गातून राजू पुजारी यांनी निवडणूक लढवली होती. त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत विरोधात निवडणूक लढववले लोहार यांनी आक्षेप घेतला होता. निवडणुक छाननीवेळी त्यांचा अर्ज वैध ठरला असला होता. तथापि, नंतर जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल करण्यात आली.

सुनावणीदरम्यान सादर कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर पुजारी यांनी दिलेली कागदपत्रे बनावट असल्याचे समितीने नमूद केले.

समितीच्या अध्यक्षा सुषमा सातपुते व सदस्यांनी २९ एप्रिल रोजी आदेश देत पुजारी यांचा धनगर जातीचा दावा व १९६१ पूर्वीचा महाराष्ट्रातील रहिवास सिद्ध न झाल्याने त्यांचा जात दाखला रद्द केला. तसेच त्यांच्या मुलाचा दाखलाही रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.