कोल्हापूर : इचलकरंजीवासियांच्या जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्‍नावर आणि सुळकूड योजना तातडीने मार्गी लावावी यासाठी विरोधी शिव शाहू आघाडी आणि महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवारी भर उन्हात जल पदयात्रा सुरू करण्यात आली. २१ किलोमीटर लांबीच्या यात्रेला शहरवासियांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला.

इचलकरंजीकरांचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्‍न वर्षानुवर्षे प्रलंबित व रखडलेला असून शहरवासियांना हक्काचे शुध्द व मुबलक पाणी मिळावे या पार्श्‍वभूमीवर जल पदयात्रा काढण्यात आली. या जल पदयात्रेच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे  शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील व युवासेना शहर समन्वयक रतन वाझे यांच्या नेतृत्वाखाली सुळकुड येथील दुधगंगा नदीतून आणलेल्या जलाने गावभागातील पुरातन महादेव मंदिरातील पिंडीस अभिषेक करून जल पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला.

महादेव मंदिर येथे शशांक बावचकर, मदन कारंडे, संजय कांबळे, उदयसिंग पाटील, रणजित जाधव, संजय तेलनाडे, सुनिल तेलनाडे, अमरजित जाधव, राजू आलासे, नंदकुमार पाटील, अब्राहम आवळे, नंदकुमार पाटील, सचिन राणे, राजेंद्र लोखंडे वाजिद तासगांवे, अभिजित रवंदे यांच्या हस्ते शिवलिंगाचे पूजन व अभिषेक करण्यात आला.

शहरभर यात्रा

त्यानंतर त्रिशुल चौक, महासत्ता चौक, सहकारनगर, आसरानगर, लालनगर, सुतार मळा, महात्मा गांधी पुतळा, धान्य ओळ, सुदर्शन चौक, हत्ती चौक, छ.संभाजी महाराज चौक, लिंबू चौक, किसान चौक, तीनबत्ती बंडगर माळ, गोकुळ चौक, कामगार चाळ, छ.शाहू महाराज पुतळा, एएससी कॉलेज, पारीक कॉलनी, मॉडर्न हायस्कुल रोडपर्यंत गेल्यानंतर दुपारच्या सत्रात विश्रांती घेण्यात आली. त्यानंतर पुन्हा पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. तर सायंकाळी उर्वरीत मार्गावरुन जल पदयात्रा शहापूर गावचावडी समोरील छ.शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर पदयात्रेचे सभेत रुपांतर झाले. या पदयात्रेत भागातील नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होत होते.

पदयात्रा कशासाठी?

इचलकरंजी महानगरपालिकेच्या कारभारावर आक्षेप घेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी या जल पदयात्रेचे आयोजन केले आहे. शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. इचलकरंजीतील जल पदयात्रा (मोर्चा) हा प्रामुख्याने शहरातील पाणीटंचाई आणि अनियंत्रित पाणीपुरवठ्याविरुद्ध विरोधकांनी पुकारलेला जनआंदोलनाचा भाग आहे. ‘आता आश्वासन नको, पाणी हवे’ या प्रमुख घोषणेखाली आयोजित या पदयात्रेदरम्यान स्थानिक राजकीय पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला आहे. इचलकरंजीत जल पदयात्रा  (मोहा प्रामुख्याने शहरातील पाणीटंचाई आणि अनियंत्रित पाणीपुरवठ्याविरुद्ध विरोधकांनी पुकारलेला जनआंदोलनाचा भाग आहे. ‘आता आश्वासन नको, पाणी हवे’ या प्रमुख घोषणेखाली आयोजित या पदयात्रेदरम्यान स्थानिक राजकीय पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला. इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न हा अनेक दशकांपासूनचा प्रलंबित व गंभीर विषय आहे。 वारंवार उद्भवणाऱ्या पाणीटंचाईमुळे नागरिकांना मुबलक आणि स्वच्छ पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असून, शहरातील मुख्य पाईपलाईन फुटणे आणि गळतीमुळे पाणी वाया जाणे अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे.