कोल्हापूर : गेल्या दोन निवडणुकांमध्ये एक वोट आणि एक नोटचे नाटकी आवाहन करणाऱ्या आमदारांनी खोक्यांच्या आमिषाने सर्वसामान्य जनतेला गंडवले. बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत के. पी.पॅटर्नला पसंती देत या आमदारांना सभासदांनी दारूण पराभवाची धूळ चारली. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार याचा अंदाज आल्याने केवळ माझ्यावरील रागापोटी हजारो ऊस उत्पादकांची प्रमुख अर्थवाहिनी असलेल्या बिद्री कारखान्याला बदनाम करण्यासाठी ते जीवाचा आटापिटा करीत आहेत. ‘

रात्रीच्या अंधारात बिद्री’ची झालेली चौकशी केवळ राजकीय हेतुने झाली असून हा त्यांचाच प्रताप आहे, असा थेट आरोप बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष , माजी आमदार के पी पाटील यांनी आमदार प्रकाश आबीटकर यांच्यावर सोमवारी केला. राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाची चौकशी झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी पत्रकार परिषदेत हे आरोप केले. तपासणी पथकाने केलेल्या तपासणीत अक्षेपार्ह असे काहीही सापडले नाही. बिद्रीचा कारभार पारदर्शी असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या कारवाई पाठीमागे महायुतीचे उमेदवार पराभुतद झाला, नुतन खासदार छत्रपती शाहू महाराज यांचे मुदाळ गावच्या ग्रामपंचायतीच्या वतिने केलेल्या स्वागतास माझी उपस्थिती व शक्तिपीठ महामार्ग विरोधी आंदोलनात माझा सहभाग हि प्रमुख कारणे आहेत.

IAS Pooja Khedkar father Dilip Khedkar
Pooja Khedkar Father First Reaction : IAS पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्या मुलीने चूक…”
maharashtra mlc election final result list (1)
Maharashtra MLC Election Result: विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; नेमकी कुणाची मतं कुणाकडे गेली?
jayant patil mlc election result 2024
पराभवानंतर जयंत पाटील यांचा मोठा दावा; राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मतांविषयी म्हणाले, “त्यांचं एक मत…”!
Milind Narvekar, Legislative Council,
मिलिंद नार्वेकर ‘खेळ’ करणार ?
pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…
Harshvarrdhan Patil
Harshvardhan Patil : “इचलकरंजी मतदारसंघ पाकव्याप्त काश्मीर मानला पाहिजे”, हर्षवर्धन पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
narendra modi takes oath 1
VIDEO : पंतप्रधान मोदी खासदारकीची शपथ घेताना राहुल गांधींनी का दाखवलं संविधान? अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा?

हेही वाचा : कोल्हापूर: टोल हद्दपार करणारच; विराट मोर्चाद्वारे आजऱ्यात टोलला सर्वपक्षीय विरोध

यावर ते म्हणाले, महायुतीच्या उमेदवाराचा आम्ही प्रामाणिकपणे प्रचार केला. मात्र लोकमत त्यांच्या विरोधात असल्याने जनतेने आपल्या मनात ठरवलेला निर्णय मतदानात व्यक्त केला. तसेच मुदाळ गावच्या सरपंच माझ्या सुनबाई असल्याने राजशिष्टाचार म्हणून मी त्याठिकाणी उपस्थिती दर्शवलेली गैर नाही. त्याचबरोबर शक्तिपीठ महामार्गामध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर बागायत जमिनी जाणार असून बहुतांश शेतकरी भुमिहिन होणार आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून सबंधीत शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायास वाचा फोडणे हे माझे कर्तव्यच होते. ते पुढे म्हणाले, “सत्तेची दहा वर्षे विकास कामे कमी आणि बिद्रीच्या प्रगतीला अडथळा जास्त अशी कारकीर्द असलेले आबिटकर हे केवळ बिद्री आणि के. पी. द्वेषाने पछाडलेले आहेत.

हेही वाचा : शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनास विरोध

गेल्या दोन पंचवार्षिक मध्ये दिवस रात्र बिद्रीची प्रगती कशी रोखता येईल यासाठीच ते शासन दरबारी कार्यरत राहिले आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्याला सभासद होता यावे यासाठी आम्ही केलेला प्रयत्न त्यांनी न्यायप्रविष्ट केला. बिद्रीच्या प्रगतीचा शिलेदार ठरलेल्या सहवीज प्रकल्पात त्यांनी जमेल तेवढे अडथळे आणले. राज्यात अव्वल ठरलेल्या सहवीज प्रकल्पाच्या टॉवर लाईनला विरोध करुन प्रकल्प चालू करण्यापासून रोखला. सुमारे १२० कोटीच्या प्रकल्पाचे व सभासदांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले. डिस्टलरी प्रकल्पाचे इरादापत्र व अन्य अनुशंगिक परवाणे व लायसन्स कोणी अडविले हे साऱ्या महाराष्ट्राला समजले. उच्च कार्यक्षमतेच्या मिळालेल्या पुरस्कारांविषयी त्यांनी शंकांचे वादळ उठवीत खोटे नाटे आरोप केले. विस्तारीकरण मंजुरीच्या फायली सत्तेच्या जोरावर तब्बल दोन वर्षे निर्णयाविना अडकवून ठेवल्या. टेस्ट ऑडिटसाठी संबंधित अधिकाऱ्यांवर सत्तेचा गैरवापर करून कुणी दबाव टाकला हे ही उभ्या महाराष्ट्राने पाहिले. सहकार व पणन विभागाने सभासद भागभांडवल १५ हजार रुपये करण्याचा घेतलेला निर्णय राज्यातील अन्य कारखान्यांच्या बरोबरच आम्ही लागू केला; परंतु सभासदांची आर्थिक ओढाताण होऊ नये, म्हणून आम्ही टप्पे घालून दिले. याबाबतही या आमदारांनी आगपाकड केली व न्यायालयात दावा दाखल केला. नसलेल्या पावसाचे कारण पुढे करीत बिद्रीची निवडणूक केवळ सत्तेच्या जोरावर पुढे ढकलली. पण सभासदांनी योग्य मुहूर्त काढला आणि बिद्रिच्या चिमणीवर वाकडी नजर टाकणाऱ्या आमदारांना सभासदांनी त्यांची योग्य जागा दाखवली. आता विधानसभेचे घोडे मैदान दूर नाही. जे बिद्रीच्या सभासदांच्या मनात आहे तेच राधानगरी भुदरगड आणि आजरा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे. येणाऱ्या निवडणुकीत मतदारच हा हिशोब चुकता करणार आहेत. आमदारांना याची जाणीव झाल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणूनच ते कुरघोडीचे राजकारण करीत आहेत. त्यांच्या खोके भूमिके विषयी जनतेची खात्री झाल्यामुळे आपली अडचण होते की काय अशी भीती आमदारांना वाटल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सत्तेच्या जोरावर दडपशाहीने बिद्रीची तपासणी करण्यास भाग पाडले. अशी आमचीही या घडीला खात्री झाली असून याबाबतचे सत्य काय आहे ते लवकरच जनतेसमोर येईल. गेल्या निवडणुकीत अशा घाणेरड्या राजकारणाला बिद्रीच्या सभासदांनी चोख उत्तर दिले आहेच. येत्या विधानसभा निवडणुकीतही अशीच लोकभावना असल्याने या लोक भावनेचा आदर सन्मान करण्यासाठी मी या रणांगणात निश्चितपणे उतरणार आहे.”