कोल्हापूर : येथे राजारामपुरी भागात कनान नगर भागात राहणाऱ्या तरुणाचा मंगळवारी दगडाने ठेचून चौघांनी निर्घृण खून केला. याबाबत पोलिसांनी दोघांना अटक केली असून दोघे पसार झाले आहेत. पंकज निवास भोसले (वय २३ ) असे या तरुणाचे नाव आहे. पंकज हा वाहन चालक आहे. तो राजारामपुरी येथील व्यावसायिक मनीष सांबारगे यांच्याकडे काम करतो. आज दुपारी तो मोटार घेऊन त्यांच्या घरी गेला होता.चौघांनी त्याला बोलावून घेतले. पुढे गेल्यानंतर त्याच्या डोक्यात काठी मारली. हल्लेखोराकडून वाचवण्यासाठी पंकज धावत गेला. हेही वाचा : कोल्हापुरातील कात्यायनी मंदिरात पुन्हा चोरी त्याला गाठून चौघांनी बेदम मारहाण केली. त्याच्या डोक्यात दगड घातले. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गणेश विक्रम काटे व निलेश विक्रम काटे या भावांना ताब्यात घेतले असून अमित गायकवाड व आणखी एक जण हल्लेखोर पसार झाला आहे.