अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून करण्याच्या कटात सहभागी पत्नीसह आठ आरोपींना मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. रवी रमेश माने, विजय रघुनाथ शिंदे, किशोर दत्ता माने, आकाश उर्फ अक्षय सिताराम वाघमारे, दिलीप वेंकटेश दुधाळे, अमित चंद्रसेन शिंदे (मयत), लिना नितीन पडवळे, गीतांजली विरुपाक्ष मेनशी, सतीश भिमसिंग वडर (फरारी), इंद्रजीत उर्फ चिल्या रमेश बनसोडे (फरारी) व मनेश साहेबांना कुचीकोरवी अशी आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणातील आरोपी लिना पडवळे ही गुन्ह्यातील मृत नितीन बाबासाहेब पडवळे यांची दुसरी पत्नी आहे. गीतांजली मेनसी ही लिनाची मैत्रीण आहे. लिना व रवी माने यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यावरून लिना हिने रमेश यास अनैतिक संबंधाची माहिती मिळाल्याने नवरा मारहाण करतो, त्याला संपवून टाकूया, असे सांगितले. त्यावर अमित चंद्रसेन शिंदे याने खून करण्यासाठी दीड लाख रुपयांची सुपारी घेतली.
हेही वाचा – माजी सरकारी कर्मचाऱ्याच्या संघर्षांची ८४ व्या वर्षी दखल; निर्यात खनिजाच्या चौकशीसाठी लढा
त्यावर सर्व संशयित आरोपींची कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये बैठक होऊन कट रचण्यात आला. त्यानुसार नितीन पडवळे याला १२ जानेवारी २०११ रोजी खडीचा गणपती येथे बोलावून घेतले. तेव्हा अमित शिंदे याने लाकडी माऱ्याचा हल्ला करून नितीन याला जखमी करून सोनसाखळी काढून घेतली. जखमी नितीन यास रात्री शाहूवाडी तालुक्यातील नागझरी या दुर्गम भागात नेले. तेथे शिंदे याने चॉपरने नितीनचे शीर धडावेगळे केले. याची सर्व छायाचित्रे त्यांनी रवी व लिना यांना पाठवली. त्यानंतर खुनासाठी वापरलेले सर्व साहित्य वारणा नदी पात्रात टाकून पुरावा नष्ट केला.
हेही वाचा – कोल्हापूरमध्ये भाजपची अशीही खेळी
सरकारी अभिवक्ता समीउल्ला महंमदइसक पाटील यांनी २१ साक्षीदार तपासले. तपास अधिकारी डी एस घोगरे, पोलीस पैरवी अधिकारी फारूक पिरजादे यांची सुनावणीवेळी महत्त्वाची मदत झाली. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश तृतीय एस. एस. तांबे यांनी वरील प्रमाणे शिक्षा सुनावली