जालना : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी – पारध रस्त्यावरील पद्मावती गावाजवळ भरधाव कार विहिरीत पडून दोन महिलाचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री ही दुर्घटना घडली. सुलताना बेगम जियाऊल्ला खान(४७) आणि अख्तरबी(७५ ) अशी मरण पावलेल्या महिलांची नावे आहेत. यापैकी एक महिलेचा विहिरीत बुडून मरण पावली तर दुसरी रुग्णालयात उपचार सुरु असताना मरण पावली.त्या दोघीही भोकरदन तालुक्यातील धावडा गावातील रहिवाशी होत्या.अबुताला जियाऊल्लाखान आणि अल्तमशखान हे या दुर्घटनेतून बचावले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे चार चाकी वाहन विहिरीबाहेर काढण्यासाठी प्रशासनाला बारा तास परिश्रम घ्यावे लागले. शनिवारी सकाळी विहिरीतून चार चाकी वाहन बाहेर काढण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 8th Aug 2026 रोजी प्रकाशित
भरधाव कार विहिरीमध्ये कोसळून दोन महिलांचा मृत्यू
अपघातात धावडा येथील दोन महिलांचा मृत्यू, तर दोन जण जखमी; १२ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर कार विहिरीबाहेर.
Written by लोकसत्ता टीम
कोल्हापूर

First published on: 08-08-2026 at 12:10 IST | © The Indian Express (P) Ltd
Kolhapur News (कोल्हापूर / प. महाराष्ट्र न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jalna bhokardan car falls into well two women dead rnb