कोल्हापूर : जयप्रभा स्टुडिओमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक करण्याची मागणी वाढत असताना या स्टुडिओची खरेदी स्थानिक शिवसेना नेत्याच्या मुलांसह काही बडय़ा व्यापाऱ्यांनी केल्याचे समोर आल्याने आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.

हा स्टुडिओ वाचवण्यासाठी कोल्हापूरकर आक्रमक झाले असून रविवारी स्टुडिओ खरेदीदाराच्या कार्यालयावर शाईफेक करून निषेध व्यक्त करण्यात आला.

BSNL, 4G, 5G, services, Central Government
बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जयप्रभा स्टुडिओची ऐतिहासिक वास्तू रौनक शहा गुंदेशा, पोपट शहा, शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचे मुलगे ऋतुराज, अभिराज यांच्यासह इतर भागीदारांनी खरेदी केली आहे. चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांनी उभारलेल्या या स्टुडिओशी कोल्हापूरकरांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे या खरेदीला कोल्हापूरकरांचा विरोध होत  आहे. 

 तरीही जयप्रभा स्टुडिओची विक्री झाल्याने संतप्त नागरिकांनी स्टुडिओची खरेदी करणाऱ्या रौनक शहा आणि पोपट शहा यांच्या भवानी मंडप परिसरातील कार्यालयावर शाईफेक केली. आंदोलक कार्यकर्त्यांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. स्टुडिओचे जतन होण्यासाठीउपोषण जयप्रभा स्टुडिओ वाचवण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्यावतीने स्टुडिओच्या दारात रविवारपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीनेही स्टुडिओ ताब्यात घेऊन कोल्हापूरचे वैभव जतन करण्याची मागणी केली आहे.