लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : काळम्मावाडी धरणातून गळतीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे धोका नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे, असे मत खासदार शाहू महाराज यांनी सोमवारी व्यक्त केले.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काळम्मावाडी ( दूधगंगा ) धरणातून गळतीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अलीकडेच शासनाच्या तज्ज्ञ समितीने या गळतीची पाहणी केली होती. त्यानंतर आज खासदार शाहू महाराज, माजी आमदार के. पी. पाटील, राधानगरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी धरण गळतीची पाहणी केली.

आणखी वाचा-दर कोसळल्याने फ्लॉवरच्या उभ्या पिकावर कोल्हापुरात ट्रॅक्टर

याप्रसंगी शाहू महाराज म्हणाले, धरणाची गळती काढण्याचे काम येत्या पंधरा दिवसांत सुरू होणार आहे. हे काम दोन वर्षांमध्ये पूर्ण होईल. गळती ९९ टक्के बंद करण्याचा प्रयत्न आहे. ऊसपीक घेण्याकडे या भागातील शेतकऱ्यांचा कल आहे. उसाला अधिक पाणी लागते. यामुळे पीक पद्धतीत शेतकऱ्यांनी बदल केला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

धरणातील प्राणी प्राशन

यावेळी शाहू महाराज यांनी धरणातील पाणी बाटलीत घेऊन ते प्राशन केले. धरणातील पाणी चांगल्या दर्जाचे आहे. कोल्हापूर शहराला नळ पाणी योजनेतून हेच पाणी पुरवले जाते, असेही ते म्हणाले.