करोनाकाळात मुंबई पालिकेने उभारलेल्या करोना केंद्रांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. याबाबत त्यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. तसेच याची कॅगद्वारे चौकशी होणार, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. दरम्यान, याप्रकरणी मुंबई महापालिकेतील काही अधिकाऱ्यांना ईडीची नोटीस मिळाल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात बोलताना भाजपा नेते किरीट सोमय्यांनी तत्कालिन मुंबई पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कोल्हापूरमध्ये टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी त्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “राणा दाम्पत्य देवेंद्र फडणवीसांचे भक्त, त्यांना वाटत असेल…”; नवनीत राणांच्या ‘त्या’ विधानावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया

Amit Shah on ajit pawar
भाजपाला साथ दिल्यानंतर अजित पवारांच्या चौकशा का थांबल्या? अमित शाह म्हणाले, “आम्ही आमचं काम…”
Rana Kapoor gets bail in latest case will be out of jail after four years
राणा कपूर यांना अखेरच्या प्रकरणातही जामीन, चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

काय म्हणाले किरीट सोमय्या?

“मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल, त्यांचे सरकारी आणि तत्कालिन सत्ताधाऱ्यांनी मुंबई महापालिकेतील घोटाळ्याची चौकशी होऊ नये, यासाठी अनेक प्रयत्न केले. पण मी मुंबई महापालिका आयुक्तांना आव्हान दिलं होतं ही देशात लोकशाही आहे आणि याची चौकशी होणारच आहे. त्याप्रमाणे चौकशी सुरू झाली आहे. सुरुवातीला करोना काळात ज्या कंपनीला कंत्राट मिळाले होते, त्याची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. हळू हळू ऑक्सिजन प्लांट घोटाळा तसेच अस्लम शेख यांचे पत्र, आणि जे कोविड सेंटर कधी सुरूच नाही झालं, त्याच्या देखभालीसाठी किशोरी पेडणेकर यांनी स्वत:च्या कंपनीला दिलेलं कंत्राट, यासर्वांची चौकशी होईल आणि करोना काळात जी काळी कमाई झाली आहे, त्याचा हिशोब आम्ही घेणारच”, अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी दिली आहे.

हेही वाचा – Video : नाशिकमध्ये सिन्नर-शिर्डी मार्गावर खासगी बस-ट्रकची समोरासमोर धडक, १० प्रवाशांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही गंभीर आरोप केले. “उद्धव ठाकरे, त्यांचे सहकाही आणि मुंबई महापालिकेतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी करोना हे कमाईचं साधन होतं. जम्बो कोविड सेंटरमध्ये कोटींचा भ्रष्टाचार झाला. याप्रकरणी मी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्राकरही दाखल केली होती. तसेच मुंबई पोलिसांनी २४ ऑगस्ट २०२२ रोजी गुन्हाही दाखल केला होता. मात्र, त्यानंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्लाब चहल यांनी १४० दिवस कोणतेही पेपर तपास यंत्रणांना दिले नाहीत. आता चार दिवसांपूर्वी त्यांनी मुंबई पोलिसांनी काही पेपर दिले आहेत”, असेही ते म्हणाले. “संजय राऊत यांचे सहकाही सुजित पाटकर यांच्या कंपनीला १०० कोटींचे कंत्राट मिळाले होते. त्यापैकी ३८ कोटींच्या पेमेंटचे मी पुरावे दिले आहे. हा पैसा उद्धव ठाकरेंच्या नेत्यांच्या बॅंक खात्यात गेला”, असा दावाही सोमय्या यांनी केला. तसेच याप्रकरणी चौकशी होईलच, असेही ते म्हणाले.