कोल्हापूर : मराठा समाज आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्यातून वाद वाढत चालला असताना बुधवारी रेखावार यांनी याप्रकरणी मराठा समाजाकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. राहुल रेखावर यांनी केलेल्या विधानाच्या संदर्भात मराठा नेत्याकडून तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला होता. हा वाद तीन आठवडे तापत होता, पण आता त्यांनी या माध्यमातून वादावर पडदा टाकला आहे.

हेही वाचा – कोल्हापुरात शाळेच्या संस्थापकाकडून विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार, अट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

हेही वाचा – लाच प्रकरणी कोल्हापुरात जीएसटी विभागाचा कर निरीक्षक जाळ्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते यांच्यात झालेल्या गोपनीय बैठकीच्या वेळी आपण काही विधान केल्याचे प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्ध झाले होते. पण अशी कोणतीही बाब घडली नसल्याचे आपण यापूर्वी स्पष्ट केले आहे. असे कोणतेही आपेक्षार्ह विधान आपण केलेले नाही. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला कधी हेतू नसतो. या गोपनीय बैठकीतीला चर्चेसंदर्भात गैरसमज होत आहे. तरी, या संदर्भात कोणी दुखावले गेले असल्यास आपण जाहीर दिलगिरी व्यक्त करतो, असे पत्रक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रसिद्ध दिलेले आहे.