कोल्हापूर : शाहु मार्केट यार्ड येथून तांदळाची पोती चोरी करणाऱ्या ३ तीन महिलांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. याची किंमत १ लाख १६ हजार रुपये असल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत या अनुषंगाने तपास करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक चव्हाण यांनी दिले होते. त्यानुसार त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
शाहू मार्केट यार्ड येथील कोहीनूर ट्रेडर्सचे गोदाम उघडे असल्याचे बघून भर दुपारच्या वेळेस या महिला आत घुसल्या होत्या. तिघींनी ७२ तांदळाची पोती चोरली होती. त्या पोत्यांची किंमत १ लाख १६ हजार रुपये आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी गतीने तपास करून या महिलांना अटक केली आहे. पोलिसांनी चोरलेला तांदळाचा साठा जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, नीलोत्पल बसू, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार संतोष बरगे, वैभव पाटील, विशाल खराडे, प्रदीप पाटील, सत्यजित तानुगडे, महेंद्र कोरवी, शिवानंद मठपती, शुभम संकपाळ, लखन पाटील, सचिन पाटील, विलास किरोळकर, संजय पडवळ, महिला सहा. फौजदार सायली कुलकर्णी यांनी केली आहे.
