कोल्हापूरमध्ये आज होणाऱ्या गोकुळच्या ६० व्या सर्वसाधारण वार्षिक सभेमध्ये सतेज पाटील विरुद्ध शौमिका महाडिक गटामध्ये संघर्ष होण्याची चिन्हं दिसत आहेत. त्यातच सत्ताधारी सभासदांनी सभा सुरु होण्याच्या एक तास आधीच सभागृहामध्ये हजेरी लावत सर्व पुढील खुर्च्यांवर बसून घेतल्याने विरोधकांना मागील खुर्च्यांवर बसावं लागणार असल्याने यावरुनही वाद होण्याची शक्यता आहे. दुपारी एक वाजता सुरु होणाऱ्या या सभेच्या आधीच विरोधकांनी समांतर सभा घेण्याचा इशारा दिला आहे. मात्र सत्ताधारी पाटील गाटाचे सभासद आणि गोकुळचे संचालक बयाजी शेळके यांनी एबीपी माझाला दिल्ल्या मुलाखतीमध्ये सर्व सभासदांच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील असं आश्वासन दिलं आहे.

दरम्यान सभा सुरु होताच विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली आहे. त्याला सत्तारूढ गटाकडून तसेच उत्तर देण्यात आले. यामुळे एकीकडे अध्यक्ष पाटील यांचे भाषण आणि दुसरीकडे घोषणा-प्रतिघोषणा यामुळे सभास्थळी एकच गोंधळ उडाला. गोकुळचे नेते आमदार सतेज पाटील ,आमदार हसन मुश्रीफ, आमदार ऋतुराज पाटील हे सभासदांसमवेत बसले आहेत. गोकुळचे नेते सभामंच सोडून खाली बसण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याने त्याची चर्चा आहे.

पिंपरी : मावळमध्ये विरोधात काम करणाऱ्या नेत्यांवर होणार कारवाई; भाजप नेत्याचा इशारा
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
Afgan Women
‘व्याभिचार केल्यास महिलांना खुलेआम दगडाने ठेचून मारले जाणार’ तालिबानची घोषणा

कसबा बावड्यातील महासैनिक दरबार हॉलमध्ये गोकुळची सभा एक वाजता सुरु झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या सभेवरुन सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून प्रश्नांची आणि आरोपांची सरबत्ती केली जात असतानाच आज या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण आहे. विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी सत्ताधाऱ्यांची असल्याचं बयाजी शेळके यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच दुसरीकडे विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी सुरु आहे. महाडिक गटाकडून स्वत: खासदार धनंजय महाडिक सभेसाठी हजर राहणार असल्याने या ठिकाणी मोठी सुरक्षाही ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, बोर्डाच्या सदस्या असणाऱ्या शौमिका महाडिक आणि विरोधक येण्याआधीच सभागृहात गर्दी झाली आहे. सत्ताधारी सभासदांनी पुढील खुर्चांवर जागा पडकल्याने विरोधकांना मागच्या खुर्च्यांवर बसावं लागणार आहे. सत्ताधारी सभासद आधीच येऊन पुढच्या खुर्च्यांवर बसले आहेत. सगळे गोकुळचे सभासद या ठिकाणी आले आहेत. विरोधी गटाचे सभासद दुपारी साडेबारापर्यंत या ठिकाणी आलेले नव्हते. या निवडणुकीच्या निमित्ताने सतेज पाटील विरुद्ध म्हाडीक असा सामना पहायला मिळणार आहे.

“सभासद उस्फुर्तपणे आलेले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक असं काही नाही. सभा खेळीमेळीत पार पडेल,” असा विश्वास बयाजी शेळकेंनी व्यक्त केला आहे. “जोपर्यंत दूध उत्पादक सभासदांच्या शंकांचं समाधान होईल अशी उत्तरं या ठिकाणी दिली जातील, त्यांचं समाधान होईपर्यंत उत्तरं देणार. सभा गुंडळण्याचा काही प्रकार नाही,” असंही शेळके म्हणाले. तसेच, विरोधकांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं दिली जातील का? या प्रश्नावर उत्तर देताना, “१०० टक्के. त्यांनी जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं दिली जातील,” असं शेळके म्हणाले.

समाधानकारक उत्तरं मिळाली नाही तर समांतर सभा आयोजित केली जाईल असं विरोधकांचं म्हणणं आहे, असं सांगत प्रश्न विचारला असता शेळके यांनी, “तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. मात्र हे बोर्ड येऊन १५ ते १६ महिने झाले आहेत. जे म्हणतायत की समाधान होत नाही त्यांचीच ४० वर्ष सत्ता होती.
एका वर्षात असं काय घडलं?” असा प्रश्न विचारला आहे. “राजकारणासाठी ते बोलत असतात. तो त्यांचा प्रश्न असेल. अशापद्धतीचं वक्तव्य बोर्डात असणाऱ्या शौमिका म्हाडिक करतात हे दुर्दैवी आहे. निश्चितपणे संघाच्या नावलौकिकाला काळीमा फासला जाणार नाही किंवा गोकुळ या ब्रॅण्डला डाग लागेल अशापद्धतीचं वक्तव्य त्यांनी करु नये,” शेळके यांनी सभा सुरु होण्यापूर्वी म्हटलं होतं.