कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाने कार्यक्षेत्राबाहेरील गाय दूध खरेदी दर प्रतिलिटर ३० रुपये करण्याचा निर्णय रविवारी घेतला. राज्यात खाजगी व इतर दूध संघांचे गाय दुधाचे खरेदी दर प्रतिलिटर २७ रुपये पर्यंत कमी झाले होते. गाय दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनाने प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जाहीर केले. त्यासाठी ३० रुपये दर देण्याची अट आहे. गोकुळ कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिलिटर ३३ रुपये तर जिल्ह्याबाहेर २८.५० रुपये दर देत आहे. हेही वाचा.विशाळगड अतिक्रमण मुक्त करावा; हिंदुत्ववाद्यांची मागणी गाय दूध अनुदानास पात्र होण्यासाठी गाय दूध खरेदीचा दर प्रतिलिटर ३० रुपये करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली.