कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने देण्यात येणाऱ्या २०२३ मधील ग्रंथ पुरस्कारासाठी डॉ. माणिकराव साळुंखे, समीर गायकवाड, वनिता जांगळे, विठ्ठल खिल्लारी, मुबारक उमराणी यांच्या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे.

पुरस्कार प्राप्त पुस्तके आणि लेखकांची नावे अशी- १. देवदत्त पाटील पुरस्कार: सवळा- विठ्ठल खिल्लारी (कादंबरी), २.शंकर खंडू पाटील पुरस्कार: वसप- महादेव माने (कथासंग्रह), ३.अण्णा भाऊ साठे पुरस्कार: झांबळ- समीर गायकवाड(कथा) ,४. कृ.गो.सूर्यवंशी पुरस्कार: – विद्येच्या प्रांगणात-माणिकराव साळुंखे ( संकीर्ण), ५. शैला सायनाकर पुरस्कार: वनिता जांगळे – तिच्या जगण्याची कविता होताना (कवितासंग्रह), ६.चैतन्य माने पुरस्कार (प्रथम प्रकाशन)- जोखड -मुबारक उमराणी (कवितासंग्रह) आणि ७. बालवाड्मय पुरस्कार- प्रतिभा जगदाळे- हसरी शाळा यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

हेही वाचा – स्मार्ट प्रीपेड मीटर्स योजना रद्द केल्याची देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृत घोषणा करावी – प्रताप होगाडे

विशेष पुरस्कारामध्ये

१. वसंत केशव पाटील पुरस्कार- शिक्षण संवाद तिरकस आणि चौकस -राजेंद्र कुंभार, २. किरण शिंदे पुरस्कार -कहाणी एका सोंगाड्याची -संपत पार्लेकर, ३. हटके सोचो – दीपक कुलकर्णी, ४. महात्मा गांधी आणि त्यांचे सांगाती – दशरथ पारेकर, नंदा पारेकर, ५. संतांचा तो संग नव्हे भलतैसा -महावीर अक्कोळे, ६. प्रतिसरकार: शिराळा पेटा -विजयकुमार जोखे, ७. पासष्टीचे अभंग -शाहीर पाटील, ८. गावगोष्टी- बाबुराव बन्ने, ९. बॅ.बाळासाहेब खर्डेकर -बी.जी. मांगले, १०.-हासपर्व-विद्यासागर अध्यापक, ११. हिंगणमिठ्ठा -उत्तम फराकटे, १२. शब्दक्रांतीचे शाहिरी पर्व -प्रदीप कांबळे, १३. धर्मनिरपेक्षता -सचिन कुसनाळे, १४. महाराष्ट्रातील शास्त्रज्ञ -उषा खंदारे १५. काय नवाल इपईलं -संपादक अशोक चोकाककर, १६. चंद्र नगरीचा शब्द -अशोक दास, १७. वळणं आणि वळण- जयवंत जाधव, १८.कवितेची वही – शालिनी पवार, १९. प्रेम म्हणजे- सुषमा शितोळे, २०. गाभाऱ्यातील सुहास -अभय जाधव, २१. माझ्या अंगणातील गीताई -किरण पाटील, २२. ऐकीबेकी-विठ्ठल वडाम, २३. लाही-अनिल घस्ते, २४. आदिवासी संस्कृती-शशिकांत अन्नदाते, २५. कावेरी -अपर्णा पाटील, २६. माणसाची किंमत- रवींद्र पाटील, २७. सर्जन विसर्जन- विक्रम वागरे, २८. खस्ता- पी. एस.पाटील यांचा समावेश आहे.

हेही वाचा – बारामती येथे २२ व २३ जून रोजी स्वाभिमानीची राज्य कार्यकारणीची बैठक : राजू शेट्टी

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांसह सीमाभागातील मराठी लेखकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. २०२३ या वर्षातील ग्रंथ पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून डॉ. विजय चोरमारे , डॉ. नंदकुमार मोरे, वसंत खोत, सुप्रिया वकील आणि गौरी भोगले यांनी काम पाहिले.

पुरस्कार वितरण समारंभ लवकरच मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याचे दमसाचे कार्याध्यक्ष प्रा. दि.बा. पाटील, कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी कळवले आहे.