कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेकडून सभासद नोंदणी बाबत पक्षपातीपणा केला जात आहे. सदस्य नोंदणीचे अर्ज भरून घेतले आहे. मात्र सदस्य पद देण्यात आले आहे की नाही याबाबत परिषदेकडून काहीच खुलासा केला जात नाही.कोल्हापूर नाट्य परिषद शाखेकडून सभासद नोंदणी बाबत पक्षपातीपणा केला जात आहे, असा आरोप रोहन सुनील घोरपडे, सुनील बाळासाहेब घोरपडे यांच्यासह रंगकर्मींनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

त्यांनी सांगितले की, कोल्हापूर नाट्य परिषदेचे काम वाढावे यासाठी अनेक जण सभासद होण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु सदस्य नोंदणी बाबत कोल्हापूर शाखेकडून सकारात्मक सहकार्य केले जात नाही. रोहन घोरपडे यांनी ४ मार्च २०२३ रोजी सभासद शुल्कासह कोल्हापूर शाखेचे तत्कालीन अध्यक्ष गिरीश महाजन यांच्याकडे अर्ज सादर केला पण त्याची पोचपावती देण्यात आली नाही. रोहन घोरपडे यांना सभासद करून घेतले आहे की नाही हे काहीच स्पष्टपणे सांगितले गेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा १३ एप्रिल रोजी रोहन घोरपडे, सुनील घोरपडे यांनी अर्ज भरला.

परंतु अद्याप सभासद करून घेतले नाही याबाबत उडवाउडवीचे उत्तरे दिली जातात. कोल्हापूर शाखेतील पदाधिकारी पक्षपातीपणे काम करीत असतात. त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असतात. त्यामुळे परिषदेच्या कामकाजा विरोधात धर्मादाय आयुक्त कार्यालय मुंबई यांच्याकडे दावा दाखल केला आहे. याचे काम वकील शरद पाटील पाहत आहेत, असेही रोहन घोरपडे, सुनील घोरपडे यांनी सांगितले.

वादग्रस्त पार्श्वभूमी

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या कामकाजाबाबत यापूर्वीही तक्रारी झाल्याच्या नोंदी आहेत. कोल्हापूर नाट्य परिषद शाखेतील वादाशी संबंधित बातम्या जुन्या आहेत (२०१९ च्या आसपास) आणि त्या प्रामुख्याने नवोदित कलाकार आणि विद्यमान कार्यकारिणी यांच्यातील मतभेदांशी संबंधित होत्या.नाट्यपरिषदेच्या कोल्हापूर शाखेत नवनवीन उपक्रम राबवले जात नसल्याने, तसेच केवळ व्यावसायिक नाट्यव्यवसाय वृद्धीकडे लक्ष दिले जात असल्याने अनेक नाट्यकर्मींमध्ये नाराजी होती.

सध्याच्या संचालक मंडळात सक्रिय रंगकर्मींची संख्या कमी असल्याचे सांगून, सर्व कलाकारांना प्रतिनिधीत्व मिळत नसल्याची तक्रार आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात नाट्यपरिषदेची दुसरी शाखा स्थापन करण्याची मागणी किंवा चर्चा काही काळापूर्वी झाली होती. सध्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोल्हापूर शाखेची नवीन कार्यकारिणी कार्यरत आहे. जुलै २०२५ मध्ये झालेल्या बैठकीत मिलिंद अष्टेकर यांची अध्यक्षपदी तर आनंद कुलकर्णी यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली होती.