कोल्हापूर : येत्या २ मार्चपासून सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात कोल्हापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा सुरू होणार आहे. सध्या कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर सकाळच्या सत्रात विमानसेवा सुरू आहे. प्रवाशांच्या मागणीवरून खासदार धनंजय महाडिक यांनी पाठपुरावा केला.

दोन मार्चपासून सायंकाळच्या सत्रातही कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर अशी विमान सेवा सुरू होत आहे. सुरुवातीला आठवड्यातील दोन दिवस सायंकाळची कोल्हापूर-मुंबई विमान सेवा असेल. लवकरच संपूर्ण आठवडाभर सायंकाळची विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले आहे.

कोल्हापूर विमानतळ झपाट्याने विकसित होत आहे. सध्या कोल्हापुरातून मुंबई, बेंगलोर, हैदराबाद, तिरुपती आणि अहमदाबाद या मार्गावर प्रवासी विमानसेवा सुरू आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून दोन मार्चपासून कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर सकाळी आणि सायंकाळी अशा दोन्ही वेळी विमानसेवा सुरू होत आहे.

दर मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता मुंबईतून विमान कोल्हापूरच्या दिशेने उड्डाण करेल, आणि पाच वाजून ३५ मिनिटांनी हे विमान कोल्हापुरात येईल. तर सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावरून पुन्हा मुंबईच्या दिशेने विमानाचे उड्डाण होईल आणि सात वाजून दहा मिनिटांनी हे विमान मुंबईला पोहोचेल.

दोन मार्चपासून ही नवी प्रवासी हवाईसेवा सुरू होत असून, पहिल्या टप्प्यात दर मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळच्या सत्रातील स्टार एअरवेजचे विमान प्रवासी सेवा देईल. लवकरच आठवड्यातील सातही दिवस सायंकाळच्या सत्रातील कोल्हापूर मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न असेल, तसेच सायंकाळी साडेचार ऐवजी सायंकाळी सात-साडेसात नंतर मुंबईहून विमान उड्डाण करेल यासाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केले आहे. मात्र तूर्तास तरी कोल्हापूर मुंबई कोल्हापूर या मार्गावर सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन वेळी विमानसेवा सुरू होत असल्याने, प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने कोल्हापूर विमानतळ हा टेकड्यांच्या प्रदेशामुळे पावसाळ्यात उड्डाण व पडावासाठी(लॅंडिंग) असुरक्षित म्हणून घोषित केला आहे.कोल्हापूर विमानतळ हा एक लहान विमानतळ आहे जो सह्याद्री पर्वतराजीत व अनेक नद्या व तलावांच्या मध्यभागी आहे. सध्या याच विस्तारीकरण चालू आहे.

महाराष्ट्र शासनाने कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी अधिक लांब करण्याचे काम चालू आहे.त्याव्यतिरिक्तही, उड्डाण व अवतरणासाठी सभोवतालची स्थिती व टेकड्या या असुरखितच राहतील.त्यावर करोडो रुपये खर्च करणे आवश्यक आहे विमानन तज्ज्ञ हे वाढीएवजी, सपाट असलेल्या दुसऱ्या वेगळ्या जागेस प्राधान्य देतात.