कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत सत्तेत एकत्र असलेल्या एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये मंगळवारी जोरदार शाब्दिक वाद उफाळून आला. परिस्थिती इतकी बिघडली की, नेत्यांनी थेट बैठकीतच शड्डू ठोकत एकमेकांना बघून घेण्याची भाषा केली. शिवाय, धमकी दिल्याने काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.
कोल्हापूर महापालिकेत सत्ता स्थापनेनंतर अवघ्या काही दिवसांतच महायुतीत ठिणगी पडली होती. स्थायी समितीसह अन्य समित्यांवरील सदस्य आणि सभापती पदाच्या निवडीवरून महायुतीच्या दोन गटनेत्यांमध्ये हमरीतुमरी झाल्याने वातावरण तापले होते याचीच पुनरावृत्ती आज पाहायला मिळाली.
महानगरपालिकेमध्ये वृक्ष प्राधिकरणासंदर्भात आयोजित बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदिल फरास यांनी वृक्षतोडीशी संबंधित एक प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी कडाडून विरोध दर्शवला. प्रत्येक मुद्द्याला आणि प्रस्तावाला सातत्याने विरोध होत असल्याचे लक्षात आल्यानंतर यावरून दोन्ही नेत्यांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद पाहता पाहता विकोपाला गेला.
बैठकीदरम्यान दोन्ही नेते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. एकमेकांना बघून घेण्याची भाषा वापरली. थेट बैठकीतच शड्डू ठोकले. एवढेच नव्हे तर, महापालिकेतून खाली चौकात चल, तुला दाखवतो, अशा धमक्याही देण्यात आल्या. या प्रकारामुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली.
या वादाची कुणकुण लागताच दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या आवारात व बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. परिणामी, महापालिकेसमोरील वातावरण काही काळासाठी तणावपूर्ण बनले. तणाव वाढल्याचे लक्षात घेताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीला पांगवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. काहीं नगरसेवकांनी हा वाद थांबवण्याचा प्रयत्न सुरू केला होता.
आधी काय घडले होते?
यापूर्वी परिवहन सभापती निवडीनंतरही या दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाला होता. तो वाद ताजा असतानाच आता वृक्ष प्राधिकरण बैठकीत तो पुन्हा उफाळून आला. बैठकीदरम्यान दोन्ही नेते एकमेकांच्या अंगावर धावून गेले, एकमेकांना बघून घेण्याची भाषा वापरली आणि थेट बैठकीतच शड्डू ठोकले. एवढेच नव्हे तर, “महापालिकेतून खाली चौकात चल, तुला दाखवतो,” अशा धमक्याही देण्यात आल्या होत्या. या प्रकारामुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली. बैठकीतील या वादाची कुणकुण लागताच दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या आवारात व बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. परिणामी, महापालिकेसमोरील वातावरण काही काळासाठी अत्यंत तणावपूर्ण बनले. तणाव वाढल्याचे लक्षात घेताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीला पांगवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली होती.
