कोल्हापूर: चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ५० मीटर रायफल प्रकारात भारताने सुवर्णपदक मिळवले. कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे याने अखिलेश वरण, ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर यांच्या साथीने सुवर्णवेध घेतला. त्यांनी १७६९ गुणांची कामे करताना चीन व टाकले. कांबळवाडी वाळवे (तालुका करवीर) येथे राहणाऱ्या स्वप्नील यांनी भोसला मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश मिळवून रायफलचे प्रशिक्षण घेतले. राष्ट्रीय ५९व ६१ व्या स्पर्धेत त्यांने सुवर्णपदकाची कमाई केली होती. २०१५ मध्ये कुवेत येथे झालेल्या उपकनिष्ठ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत थ्री प्रोन प्रकारात त्याने विजेतेपद पटकावले होते. हेही वाचा. धैर्यशील माने यांना भाजपच्या उमेदवारीचे वेध? २०२२ मध्ये कैरोत झालेल्या विश्वचषक नेम बाजी स्पर्धेत ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारात दोन सुवर्ण, दोन रौप्य पदके मिळवण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. या स्पर्धेच्या यशामुळे आगामी २०२ टोकियो ओलंपिक कोटा स्पर्धेचे तिकीट त्यांनी पटकावले आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाज प्रशिक्षक दिपाली देशपांडे या त्याच्या प्रशिक्षिका आहेत.