कोल्हापूर : क्रिकेटच्या ध्यासातून तिघा तरुणांनी ग्रामीण भागात लेदर बॉलचे क्रिकेटचे सुसज्ज क्रिकेट मैदान अल्पकाळात साकारले आहे. शहर आणि ग्रामीण भागातील उदयोन्मुख क्रिकेट खेळाडूंसाठी कोरोची (ता. हातकणंगले) या दुष्काळी भागातील हे मैदान म्हणजे अत्यंत चांगली संधी देणारे ठरत आहे.

भारतीय जनमानस आणि क्रिकेट यांचे नाते तसे जिव्हाळ्याचे. देश-विदेशात कोठेही क्रिकेट सामना असला तरी त्याकडे भारतीयांचे डोळे – कान लागलेले असतात. अगदी ग्रामीण भागातही खेळ हा रुजला आहे. इचलकरंजी महापालिकेने तर केवळ लेदर बॉल क्रिकेटसाठी भव्य राजाराम स्टेडियम उभारले आहे. या हिरवळीवर अनेक खेळाडू तयार झाले पण सध्या या मैदानाची दुरवस्था झाली आहे. परंतु त्यांना आवश्यक ते पाठबळ व सरावासाठी जागा उपलब्ध नसल्याने या क्रिकेटपटूंच्या खेळाला मर्यादा पडत आहेत. इचलकरंजीत आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकांना कोल्हापूर, पुणे अथवा मुंबई येथे प्रशिक्षणासाठी जावे लागते.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Kiran Mane on Ujjwal Nikam
“दोन पक्षांवर दरोडे पडले तेव्हा हा भामटा…”, किरण मानेंची उज्ज्वल निकम यांच्यावर टीकात्मक पोस्ट
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Vijay Wadettiwar on Mumbai Blast Case
“हेमंत करकरेंना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतील नव्हती, उज्ज्वल निकमांनी…”; विजय वडेट्टीवारांच्या विधानाने खळबळ
Bhavesh Bhinde arrested
मोठी बातमी! घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक; उदयपूरमधून पोलिसांनी घेतले ताब्यात
Raj and uddhav
राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये फरक काय? नारायण राणेंनी भरसभेत सांगितला दोघांचाही स्वभाव; म्हणाले, “मी बऱ्याच वर्षांपासून…”
Anusha Dandekar post for Bhushan Pradhan said she loves him
“माझं तुझ्यावर खूप प्रेम…”, अभिनेत्री अनुषा दांडेकरची भूषण प्रधानसाठी खास पोस्ट, म्हणाली…
army helicopter emergency landing sangli marathi news, army helicopter sangli marathi news
सांगली: मिरजेजवळ शेतात लष्कराच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

हेही वाचा – कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेचे सांडपाणी प्रक्रियेविना पंचगंगेत; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातील माहिती

लाखमोलाचे योगदान

परिणामी येथे खेळणाऱ्या क्रिकेट खेळाडूंसाठी चांगले मैदान असावे असे स्वप्न घेऊन हरिष खंडेलवाल, भरत पाटील व युवराज यवलुसकर यांनी एकत्र येऊन कोरोची येथील उजाड माळावर सुमारे ८० लाख रुपये खर्च करून पाच एकर जागेत नवोदीत क्रिकेटपटूंसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. अवघ्या तीन महिन्यांत येथे मुख्य मैदानाची तसेच चार जाळीतील सराव मैदानाची उत्साहवर्धक हिरवळ फुलली आहे. हे तिघे मागील ११ वर्षांपासून सहारा क्रिकेट अ‍ॅकॅडमी क्रिकेटपटूंसाठी प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे. आता अत्याधुनिक सुविधांसह क्रिकेटपटूंना योग्य ते मार्गदर्शन केले जाणार आहे. येथे ७ फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, आहारतज्ञ आदी वेगवेगळ्या विभागाचे प्रशिक्षक असून क्रिकेटचे मैदान गाजवलेले आनंदा दोपारे हे निशुल्क सेवाभावी मुख्य प्रशिक्षणाची जबाबदारी निभावणार असल्याचे संयोजकांनी गुरुवारी सांगितले.

हेही वाचा – कोल्हापूर जिल्ह्यातील गावांमध्ये पावसाळ्यापूर्वी मरीआईचा गाडा ओढण्याच्या प्रथेचे पालन

अद्यावत सुविधा

आजवर येथील अनेक खेळाडू राज्यसंघात खेळले असून त्यांनी देशासाठी खेळावे त्यादृष्टीने चॅम्पियन्स सहारा क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून मार्गदर्शनासह तयारी करुन घेतली जाणार आहे. मुला-मुलींसाठी स्वतंत्र ड्रेसिंग रुम, स्वच्छतागृह, व्यायामशाळा, वाहन व्यवस्था आदींची सोय आहे.या अकामदीचा जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन अकादमीच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९९२१३३५०५५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.