Kolhapur ZP Election Results LIVE Updates (कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल): महाराष्ट्रातील यंदाच्या निवडणूक हंगामातील शेवटची निवडणूक जिल्हा परिषदेची ठरली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार राज्य निवडणूक आयोगाने आधी नगरपरिषद-नगरपंचायत, त्यानंतर महानगरपालिका आणि सरतेशेवटी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. विशेष म्हणजे आधी झालेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये राज्यातील आघाड्या व युतींच्या अगदी उलट चित्र अनेक ठिकाणी दिसलं. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकांमध्येदेखील अनेक ठिकाणी राज्यातील मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिल्याचं दिसून आलं. कोल्हापूर जिल्हा परिषदेची निवडणूक त्यासाठी अपवाद नव्हती!

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांपैकी फक्त १२ जिल्हा परिषदा व एकूण १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका यंदा घेतल्या जात आहेत. या निवडणुकांसाठी एकीकडे राज्यात सत्तेत असणाऱ्या महायुतीमधील भाजपा, एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष कुठे एकमेकांसोबत तर कुठे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचं दिसून आलं. दुसरीकडे विरोधकांचीदेखील काहीशी अशीच स्थिती पाहायला मिळाली.

कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ वेळापत्रक (Kolhapur ZP Election Schedule 2026)

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी १२ जिल्हा परिषदांसाठी यंदा निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. त्याअंतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक २०२६ साठी मतदानाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार ही निवडणूक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार होती. मात्र, राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यभरात शोककळा पसरली. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने परिस्थितीचा आढावा घेत निवडणूक प्रक्रियेच्या वेळापत्रकात आवश्यक बदल केले.

त्यानुसार, कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडले असून, मतमोजणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणात पार पडलेल्या या निवडणुकीकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

निवडणूक टप्पातारीख / वेळ
सूचना प्रसिद्धी१६ जानेवारी
नामनिर्देशन स्वीकारणे१६ जानेवारी ते २१ जानेवारी
छाननी२२ जानेवारी २०२६
माघारीची अंतिम मुदत२७ जानेवारी, दुपारी ३:०० पर्यंत
अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप२७ जानेवारी, दुपारी ३:३० नंतर
मतदान७ फेब्रुवारी, सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत
मतमोजणी९ फेब्रुवारी, सकाळी १०:०० पासून

कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वॉर्ड संख्या (Kolhapur Zila Parishad and Panchayat Samiti Wards Count)

कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचे ६८ निवडणूक विभाग आणि १२ पंचायत समित्या आहेत. या जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात एकूण १३६ पंचायत समिती वॉर्ड आहेत.

माहितीसंख्या
जिल्हा परिषद एकूण वॉर्ड६८
पंचायत समिती (सीट संख्या)१२
पंचायत समिती एकूण वॉर्ड१३६

Kolhapur Zila Parishad Election Result 2017 – Party-wise Seats कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०१७- पक्षनिहाय जागा

२०१७ साली या जिल्हा परिषदेच्या घेण्यात आलेल्या निवडणुकीत इतर पक्ष १८ जागांसह प्रथम क्रमांकावर होता. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर १४ जागांसह भाजप पक्षाची कामगिरी राहिली.

कोल्हापूर जिल्हा परिषदेचा विचार केला असता मागील म्हणजेच २०१७ साली झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) पक्षाला विजय मिळाला होता. निवडणुकीनंतर शौमिका अमल महादिक यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. तर उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)चे सरजेराव पाटिल यांनी बाजी मारली होती.

पक्षाचे नावजिंकलेल्या जागा
इतर१८
भाजप१४
काँग्रेस१४
राष्ट्रवादी११
शिवसेना१०
एकूण६७

कोल्हापूर जिल्हा परिषद वॉर्ड निहाय निकाल २०१७ (Kolhapur Zilla Parishad Ward Wise Results 2017)

कोल्हापूर जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये एकूण ६८ निवडणूक विभाग असून २०१७ साली तेव्हाच्या राजकीय स्थितीचं प्रतिबिंब या जिल्ह्याच्या निकालांमध्ये पाहायला मिळालं.

वॉर्ड क्रमांकविजेत्याचे नावविजेत्या पक्षाचे नाव
५१सविता राजाराम भटाळेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)
४३राहुल पांडुरंग पाटीलभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
सर्जेराव बंडू पाटीलजन सुराज्य शक्ती
आकांक्षा अमरसिंह पाटीलशिवसेना (SHS)
शिवाजी अकरम मोरेजन सुराज्य शक्ती
४७विनय राजेंद्र पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)
हंबीरराव केशव पाटीलशिवसेना (SHS)
विजय गंगाधर बोरागेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)
विशांत सुरेश महापुरेजन सुराज्य शक्ती
प्रियांका संपतराव पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)
कल्पना केरबा चौगलेभारतीय जनता पक्ष (BJP)
शंकर किसन पाटीलजन सुराज्य शक्ती
१०सर्जेराव ज्ञानदेव पाटीलशिवसेना (SHS)
११पुष्पा वसंत अलाटेकरजन सुराज्य शक्ती
१२मनीषा विजयसिंह मानेजन सुराज्य शक्ती
१३प्रवीण श्रीपती यादवशिवसेना (SHS)
१४अरुणराव जयसिंगराव इंगवलेभारतीय जनता पक्ष (BJP)
१५शौमिका अमल महाडिकभारतीय जनता पक्ष (BJP)
१६पद्माराणी राजेश पाटीलस्वाभिमानी पक्ष
१७प्रसाद बाळकू खोबरेभारतीय जनता पक्ष (BJP)
१८विजया बाळासाहेब पाटीलभारतीय जनता पक्ष (BJP)
१९वंदना चंद्रकांत मगदूमकोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी
२०स्मिता वीरकुमार शेंडुरेभारतीय जनता पक्ष (BJP)
२१राहुल प्रकाश आवाडेकोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी
२२शुभांगी रामचंद्र शिंदेस्वाभिमानी पक्ष
२३स्वाती विशाल ससाणेशिवसेना (SHS)
२४परवीन दादेपाशा पटेलराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)
२५अशोक कोंडीराम मानेभारतीय जनता पक्ष (BJP)
२६नाईक निंबाळकर राजवर्धन रामराजे विठ्ठलरावभारतीय जनता पक्ष (BJP)
२७विजय जयसिंग भोजेभारतीय जनता पक्ष (BJP)
२८बंदा अप्पा मानेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
२९युवराज दत्ताजीराव पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)
३०अंबरिशसिंह संजय घाटगेशिवसेना (SHS)
३१मनोज गणपती फराकाटेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)
३२शिवानी विजयसिंह भोसलेशिवसेना (SHS)
३३शिल्पा शशिकांत खोतराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)
३४मनीषा सतीश कुरणेशिवसेना (SHS)
३५कोमल सरदार मिसाळशिवसेना (SHS)
३६महेश तुकाराम चौगुलेभारतीय जनता पक्ष (BJP)
३७वंदना विजय पाटीलभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
३८सरिता शशिकांत खोतभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
३९मनीषा प्रकाश टोणपेभारतीय जनता पक्ष (BJP)
४०रसिका अमृत पाटीलस्वतंत्र
४१सुभाष ज्ञानदेव सातपुतेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
४२शिल्पा चेतन पाटीलभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
४४संध्याराणी विलास बेडगेभारतीय जनता पक्ष (BJP)
४५भगवान बापू पाटीलभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
४६बजरंग ज्ञानू पाटीलभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
४८पांडुरंग हिंदुराव भांदीगरेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
४९वंदना अरुण जाधवशिवसेना (SHS)
५०सविता शिवाजी चौगलेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
५२रेश्मा राहुल देसाईभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
५३रोहिणी अर्जुन आबिटकरशाहू महाआघाडी किल्ले पन्हाळा पार्टी
५४जीवन पांडुरंग पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)
५५स्वरूपाणी सत्यजित जाधवशाहू महाआघाडी किल्ले पन्हाळा पार्टी
५६उमेश मुनुंदराव आपटेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
५७सुनीता रमेश रेडेकरआघाडी
५८जयवंत गुंडोपंत शिंपीराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)
५९अनिता सोमन्ना चौगुलेभारतीय जनता पक्ष (BJP)
६०रेखा राजकुमार हत्तरकीताराराणी आघाडी पक्ष
६१राणी विजयकुमार खमालेट्टीताराराणी आघाडी पक्ष
६२सतीश भीमगोंडा पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)
६३हेमंत तुकाराम कोळेकरभारतीय जनता पक्ष (BJP)
६४सचिन सदानंद बल्लाळभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
६५कल्लाप्पा सतुराम भोगनयुवक क्रांती आघाडी
६६अरुण रामचंद्र सुतारभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
६७विद्या विलास पाटीलयुवक क्रांती आघाडी

कोल्हापूर जिल्हा परिषद वॉर्ड निहाय निकाल २०२६ (Kolhapur ZP Ward Wise Election Results 2026)

कोल्हापूर जिल्हा परिषदेअंतर्गत एकूण ६८ जिल्हा परिषद प्रभाग आहेत. तसेच जिल्ह्यातील १२ पंचायत समित्यांमध्ये एकूण १३६ प्रभागांचा समावेश आहे. २०११ च्या जनगणनेनुसार कोल्हापूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ३,८७६,००१ इतकी आहे. २०२६ साली झालेल्या या निवडणुकांमधील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभागांचे सविस्तर निकाल येथे पाहता येतील.

महाराष्ट्रातील महत्वाचे जिल्हा परिषद निवडणुका निकाल २०२६ लाईव्ह अपडेट (Maharashtra Zilla Parishad Election Results 2026)

कोल्हापूर जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांची नावे

क्रमांकपंचायत समित्यांची नावे
शाहूवाडी पंचायत समिती
पन्हाळा पंचायत समिती
हातकणंगले पंचायत समिती
शिरोळ पंचायत समिती
करवीर पंचायत समिती
गगनबावडा पंचायत समिती
राधानगरी पंचायत समिती
कागल पंचायत समिती
भुदरगड पंचायत समिती
१०आजरा पंचायत समिती
११गडहिंग्लज पंचायत समिती
१२चंदगड पंचायत समिती

महाराष्ट्र जिल्हा परिषद २०२६ निवडणुकीशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न-उत्तरे

प्र. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी झाल्या?

उ. ७ फेब्रुवारी २०२६, सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० या वेळेत मतदान पार पडले.

प्र. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे निकाल कधी जाहीर करण्यात आले?

उ. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात आले.

प्र. कोल्हापूर जिल्हा परिषदेची रचना कशी आहे? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर किती निवडणूक विभाग आहेत?

उ. कोल्हापूर जिल्हा परिषदेत एकूण ६८ जिल्हा परिषद निवडणूक विभाग आहेत. जिल्ह्यात १२ पंचायत समित्या कार्यरत आहेत. या पंचायत समित्यांच्या कार्यक्षेत्रात एकूण १३६ पंचायत समिती निवडणूक विभाग समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे, पंचायत समितीच्या निवडणूक विभागांची संख्या जिल्हा परिषद निवडणूक विभागांच्या तुलनेत दुप्पट असते.

प्र. महापौरांची निवड कशी केली जाते?

उ. महापौरांची निवड निवडून आलेल्या नगरसेवकांमधून होते. बहुमत असणाऱ्या पक्षाचे उमेदवार महापौर व उपमहापौर होतात.

प्र. महाराष्ट्रात किती जिल्हा परिषदा आहेत?

उ. महाराष्ट्रात ३६ जिल्ह्यांमध्ये मिळून ३४ जिल्हा परिषदा आहेत.

प्र. महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी कोण पात्र असतं?

उ. वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे भारतीय नागरीक मतदानासाठी पात्र असतात.

प्र. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?

उ. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.

जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम कोण जाहीर करतं?

उ. जिल्हा परिषद कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग जाहीर करतं.

प्र. महाराष्ट्रात जिल्हा परिषद निवडणूक किती वेळा होतात?

उ. जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही दर पाच वर्षांनी होतात.

प्र. जिल्हा परिषद निवडणुकीत कोणी मतदान करू शकतो?

उ. जिल्ह्यातील त्या प्रभागात नोंदणीकृत मतदार म्हणून नोंदणीकृत रहिवासी मतदानासाठी पात्र आहेत.

प्र. जिल्हा परिषद सदस्याची जबाबदारी काय आहे?

उ. जिल्हा परिषद सदस्य स्थानिक विकास प्रकल्प, कल्याणकारी योजना तसेच जिल्ह्यातील शाळा, रुग्णालये आणि ग्रामीण पायाभूत सुविधा यांचे प्रशासन आणि निर्णय घेण्याची जबाबदारी पार पाडतात.

प्र. जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड कशी होते?

उ. वार्ड सदस्य निवडून आल्यावर, ते आपापसांत मतदान करून जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड करतात.

प्र. जिल्हा परिषद निवडणुका कोण घेते?

उ. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक संस्थांसाठी स्वच्छ आणि स्वतंत्र निवडणुका घेण्यास जबाबदार आहे.

प्र. पंचायत समित्यांची सदस्य संख्या किती असते?

उ. महाराष्ट्रात पंचायत समित्यांची सदस्य संख्या त्या समितीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांच्या संख्येच्या दुप्पट असते.

प्र. जिल्हा परिषद सदस्यांची संख्या किमान व कमाल किती असू शकते?

उ. कोणत्याही जिल्हा परिषद सदस्यांची संख्या किमान ५० ते कमाल ७५ असू शकते.

प्र. मतदारांना कोल्हापूर जिल्हा परिषदेचा निकाल कुठे पाहाता येईल?

उ. मतदारांना कोल्हापूर जिल्हा परिषदेचा निकाल निवडणूक आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ व लोकसत्ता डॉट कॉमसारख्या विश्वासार्ह संकेतस्थळांवर पाहाता येईल.

डिस्क्लेमर: या पृष्ठावर नमूद करण्यात आलेली महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुकांसाठी निवडणूकविषयक माहिती विविध सार्वजनिक स्रोत, राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत अधिसूचना, माध्यमांतील अहवाल तसेच उपलब्ध आकडेवारीच्या आधारे संकलित करण्यात आली आहे. माहिती अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात आली असली, तरी कालांतराने आकडे, निकाल किंवा इतर तपशीलांमध्ये बदल होण्याची शक्यता राहते. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वाचकांनी संबंधित अधिकृत स्रोतांची पडताळणी करणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही निर्णयासाठी संकेतस्थळ किंवा प्रकाशक जबाबदार राहणार नाही.