कोल्हापूर : कोल्हापूर शहराला सोमवारी दुपारी आलेल्या पावसाने चांगले झोडपून काढले. अल्पावधीतच संपूर्ण कोल्हापूर जलमय झाले. गेले दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. तरीही आज सकाळपासून कमालीचा उष्मा जाणवत होता. दुपारी बारानंतर रस्त्यावर फिरणे मुश्कील बनले होते. तीन वाजण्याच्या दरम्यान काळे ढग दाटले. ढगांचा गडगडाट होत पावसाच्या धुवांधुर सरी कोसळू लागल्या. पावसाचा जोर इतका होता की. शहरातील अवघे जनजीवन ठप्प झाले . रस्त्यावर केवळ चार चाकी वाहने धावताना दिसत होती. पावसानंतर हवेत थंडावा निर्माण झाला.

पन्हाळा मार्गावर दरड कोसळली

दरम्यान जोरदार पावसामुळे पन्हाळ्याच्या मुख्य रस्त्यावर दरड कोसळली. यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळित होत पुन्हा पर्यायी रस्त्याची गरज अधोरेखित झाली आहे. हैराण करणाऱ्या उकाड्यानंतर दुपारी पावसाची जोरदार हजेरी लागून पन्हाळा परिसरात वातावरणात थंडावा निर्माण झाला. पावसाने पन्हाळा परिसराला झोडपून काढले. सुमारे दीड तास धुवाधार पाऊस पडत राहिला. यामुळे पन्हाळगडावरील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. पावसाने सर्वांची तारांबळ उडवली.

पन्हाळ्याच्या मुख्य रस्त्यावर जोरदार पावसामुळे दरडीतील मोठे दगड येऊन पडले. यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. पर्यटकांचाही हिरमोड झाला. ही स्थिती पाहता पन्हाळ्यासाठी पर्यायी रस्ता असला पाहिजे या मागणीला नागरिकांत जोर चढला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेले दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. तरीही आज सकाळपासून कमालीचा उष्मा जाणवत होता. दुपारी बारानंतर रस्त्यावर फिरणे मुश्कील बनले होते. तीन वाजण्याच्या दरम्यान काळे ढग दाटले. ढगांचा गडगडाट होत पावसाच्या धुवांधुर सरी कोसळू लागल्या. पावसानंतर हवेत थंडावा निर्माण झाला. पावसाचा जोर इतका होता की. शहरातील अवघे जनजीवन ठप्प झाले.