कोल्हापूर: वादग्रस्त ठरलेल्या येथील लक्षतीर्थ वसाहत मधील मदरशाचे बांधकाम गुरुवारी मुस्लिम समाजाने स्वतःहून उतरून घेतले. हि वास्तू जमीनदोस्त झाल्याने तणाव निवळला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या पंचवीस वर्षापासून स्व-मालकीच्या जागेवर असलेले मदरशाचे बांधकाम बेकादेशीर असल्याची तक्रार काही हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती. त्याआधारे कोल्हापूर महापालिकेच्या नगररचना विभागाच्या वतीने कागदपत्रे अपुरी असल्याच्या कारणा वरून बेकायदेशीर ठरवत पाडण्याचा ठरवले होते. पण त्यास मुस्लिम समाजाने विरोध केला. तर हे बांधकाम पडले पाहिजे यासाठी हिंदुत्ववादी संघटनांची प्रतिआंदोलन केल्याने काळ दिवसभर तणावाचे वातावरण होते. 

हेही वाचा >>>राजू शेट्टी – रविकांत तुपकर मतभेद शिगेला; स्वाभिमानीत आणखी एका फुटीची बीजे

धग निवळली

दरम्यान , संबंधित कागदपत्रे पूर्ण करून एका महिन्याच्या आत पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावीत. त्यानंतर रीतसर या बांधकामाला परवानगी देऊ असे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले. त्यानुसार मुस्लिम समाजाने विश्वास ठेवून आज बांधकाम उतरून घेतल्याने या प्रकरणावर पडदा पडला.

पुन्हा आंदोलनाचा इशारा

मदरसा बांधकामास रीतसर परवानगी न केल्यास आणि जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिलेला शब्द नूतन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी न पाळल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर,  प्रशासक कादर मलबारी यांनी दिला आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madrasa in lakshatirtha area of kolhapur city was demolished amy
First published on: 01-02-2024 at 18:41 IST