सर्वासाठी परवडणाऱ्या दरात एलईडी दिव्यांचे वितरण करण्यासाठी राबवलेल्या ‘उजाला’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्रात १.६२ कोटी एलईडी दिव्यांचे वितरण केले गेले आहे.
दरवर्षी सुमारे १०८ कोटी युनिटची बचत होणार आहे. २८५ मेगावॉटच्या स्थापित वीजनिर्मिती क्षमतेचीही बचत होणार आहे. तसेच कार्बन उत्सर्जनामध्ये वर्षांला सुमारे १६ लाख टनाने कपात होण्यास मदत होईल. ग्राहकांच्या वीजबिलात ४३० कोटी रुपयांची बचत अपेक्षित आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारीमध्ये ‘उन्नत ज्योती बायअफॉर्डेबल एलईडी फॉर ऑल’ (उजाला) ही योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत भारतात सुमारे १० कोटीपेक्षा जास्त एलईडी दिव्यांचे वितरण केले गेले आहे. कार्बन उत्सर्जन ३० ते ३५ टक्क्यांनी कमी करण्याचे स्पष्ट उद्दिष्ट भारताने ठेवले असून, ते साध्य करण्यासाठी ऊर्जा बचत हा प्रमुख घटक आहे. कार्बन उत्सर्जन आणखी कमी करण्यासाठी या वर्षी भारत सरकार आणखी २० कोटी एलईडी दिव्यांची खरेदी करणार आहे. कार्बन उत्सर्जनात ३० ते ३५ टक्क्यांची कपात करण्याचे धोरण म्हणून, सरकारने ऊर्जा बचतीकडे लक्ष दिले आहे.