कोल्हापूर : महाविकास आघाडीच्या २८० मतदार पाठीशी असल्याच्या दाव्यात तथ्य नाही. भाजपाच्या पाठीशी विजय साध्य करण्याइतकी मते असून ते निकालातून स्पष्ट होईल, असे स्पष्ट करून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर विधानपरिषदेत भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांचा विजय निश्चित असल्याचा निर्वाळा शुक्रवारी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदार पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक यांनी आजपासून संपर्क दौरा सुरू केला. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना ‘सतेज पाटील यांना आपल्याला १८० नव्हे तर ४२५ सदस्यांचा पािठबा आहे असे म्हणायचे असेल, अशा शब्दांत खिल्ली उडवली. आघाडीचा दावा आकडेवारीवर टिकणारा नाही. काँग्रेसचे जिल्ह्यात चिन्हावर निवडून आलेले ३६ असून राष्ट्रवादीसह ११८ सदस्य आहेत. भाजपाचे १०५ सदस्य असून प्रकाश आवाडे, विनय कोरे या आमदारांसह सहयोगी सदस्यांचे मिळून १८६ मते आहेत. फुगीर आकडे सांगून विजय मिळत नाहीत.

भाजपाला विजयासाठी ४३ मतांची गरज असून त्याची जुळणी केली असल्याचा दावाही त्यांनी केला. जिल्ह्यात शिवसेनेने कधीही भाजपाला मदत केली नव्हती. गतवेळी शिवसेनेची मते आम्हांला मिळत नव्हती. यावेळी काही मते मिळतील याबाबत आशावादी आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

राहुल आवाडे लोकसभेसाठी

इचलकरंजी येथे पाटील यांनी आमदार प्रकाश आवाडे तसेच माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या उपस्थितीत दोन वेगवेगळय़ा बैठका घेतल्या. आवाडे यांनी अमल महाडिक यांच्यासाठी आता थांबलो असलो तरी लोकसभा निवडणुकीसाठी हातकंणगले मतदारसंघातून राहुल आवाडे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचा उल्लेख केल्यावर पाटील, महाडिक यांनी हसून प्रतिसाद दिला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavikas aghadi bjp chandrakant patil ysh
First published on: 20-11-2021 at 01:59 IST