आमदार विनय कोरे यांच्या मातोश्री शोभाताई कोरे यांचे निधन

शोभाताई गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या त्यांच्यावर सोलापूरमध्ये उपचार सुरु होते.

शोभाताई कोरे

आमदार आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांच्या मातोश्री शोभाताई कोरे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले, त्या ७० वर्षांच्या होत्या. शोभाताई कोरे या वारणा उद्योग समूहाच्या आणि वारणा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा होत्या.

शोभाताई कोरे यांनी वारणा भगिनी मंडळ आणि वारणा बझारच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्या कायम वारणा पंचक्रोशीतील सांस्कृतीक, धार्मिक, सामाजिक कार्यात सहभागी असायच्या. वारणा भगिनी मंडळ व वारणा बझारच्या माध्यमातून त्यांनी महिलांना स्वावलंबी बनविण्यात पुढाकार घेतला होता.

शोभाताई गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या, त्यांच्यावर सोलापूरमध्ये उपचार सुरू होते. आज सकाळी वारणा नगर येथे त्यांचे निधन झाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कोल्हापूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mla vinay kores mother shobhatai kore passed away aau

Next Story
सायझिंग कामगारांचा गुंता ४३ दिवसांनंतरही कायम
ताज्या बातम्या