scorecardresearch

इचलकरंजी, मलकापूरमध्ये मनसे पदाधिकारी ताब्यात; हनुमान चालिसा पठण केल्याने कारवाई

इचलकरंजी व मलकापूर या नगरपालिकांच्या शहरांमध्ये बुधवारी मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा पठन व महाआरती केली.

(इचलकरंजी येथे मनसेचे शहराध्यक्ष प्रताप पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा पठन केले.)

कोल्हापूर : इचलकरंजी व मलकापूर या नगरपालिकांच्या शहरांमध्ये बुधवारी मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा पठन व महाआरती केली. मलकापूर येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कोल्हापूर शहरात पोलिसांच्या झालेल्या बैठकीनंतर तूर्त आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मशिदीवरील भोंग्यांच्या आवाजाच्या विरोधात मनसे नेते राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार इचलकरंजी शहरातील सोन्या मारुती मंदिर येथे मनसेचे शहराध्यक्ष प्रताप पाटील, रवी गोंदकर, पुंडलिक जाधव, सिंधू शिंदे, राजेंद्र निकम यांच्यासह कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा पठन केले. यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या.
मलकापुरात कार्यकर्ते ताब्यात
मलकापूर येथे मारुती मंदिरामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा पठण केले. त्यानंतर महाआरती करण्यात आली. हा कार्यक्रम संपल्यानंतर पोलिसांनी शहरप्रमुख अजय गुरव, जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर, सहकार सेनेचे अध्यक्ष संजय तांदळे, शाहुवाडी तालुका अध्यक्ष धनाजी आगलावे यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
कोल्हापुरात दुप्पट आवाजाचा इशारा
कोल्हापूर शहरात मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय करजगार, रत्नदीप चोपडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांना कलम १४९ प्रमाणे नोटीस बजावल्या होत्या. तर, अजान, भोंगे, हनुमान चालिसा या पार्श्वभूमीवर शहर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी मौलवी, मनसे पदाधिकारी यांच्याशी बैठक घेतली. बैठकीमध्ये विनापरवाना मशिदीमध्ये भोंगे लावून नमाज पठण करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याहून दुप्पट आवाजात हनुमान चालिसा व महाआरती करू असा इशारा विजय करजगार, शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले, राजू जाधव यांनी दिला.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns office bearers ichalkaranji malkapur action reciting hanuman chalisa amy

ताज्या बातम्या