कोल्हापूर : महागाईविरोधातील जनतेचा रोष सोमवारी दोन आंदोलनांतून व्यक्त करण्यात आला. कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या आंदोलकांनी गॅस सिलिंडर पंचगंगा नदीत फेकून निषेध नोंदवला. तर शिवसेनेच्या वतीने शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली.
कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, अशोक पोवार, चंद्रकांत पाटील, सुनिता पाटील, रेखा पाटील, रजनी कदम, छाया वाडेकर, लता जगताप, स्वाती मिठारी, सारिका कोंडेकर आदीजण पंचगंगा नदीघाटावर गेले. तेथे चुली पेटवून स्वयंपाक केला. संतप्त महिलांनी गॅस सिलिंडरची वाढलेली किंमत याचा निषेध म्हणून गॅसच्या टाक्या नदीत फेकून देऊन केंद्र सरकारचा निषेध केला.
शिवसेनेच्या वतीने शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. गॅस दरवाढीविरोधात नरेंद्र मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. मोदी हटाव देश बचाव , मोदी सरकार हायहाय आदी घोषणा देण्यात आल्या. जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.