कोल्हापूर: एक स्थानक एक उत्पादन या उपक्रमांतर्गत कोल्हापूर रेल्वे स्थानकातील स्टॉलचे लोकार्पण मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले.देशातील विविध ठिकाणच्या रेल्वे आधुनिकीकरण केंद्रांचे उद्घाटन, पायाभरणी, लोकार्पण सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाला. यांतर्गत कोल्हापुरातील एक स्थानक एक उत्पादन स्टॉलचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. लोकल फोर लोकल अशी भूमिका ठेवून रेल्वे स्थानकावर सर्व प्रकारचे स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात केली असून यातून पर्यटनाला चालना मिळेल, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी  केले.

 खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरात वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यासाठी प्रयत्न असले तरी काही तांत्रिक बाबींमुळे ती सुरू झाली नाही. पण लवकरच ची सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी प्रकाश उपाध्याय, दीपक खोत, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी, जयेश ओसवाल, मोहन शेट्टी, मोहन सातपुते उपस्थित होते.

हेही वाचा >>>शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांसह राजकीय विरोध सुरू, निवडणूक प्रचारात मुद्दा तापणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गूळ, मसाले आणि चप्पल

कोल्हापूर रेल्वे स्थानकावर भागीरथी महिला मंचच्या स्टॉलवर कोल्हापुरी मसाले, गुळ, बांबू उत्पादने तर अन्य एका स्टॉलवर कोल्हापुरी चप्पल उपलब्ध आहे.